

ठाणे : गेल्या काही दिवसात शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या पटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे शासकीय अधिकारी-कर्मचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पोलीस दप्तरी झालेल्या नोंदीची आकडेवारी शोधली असता २०२४ या वर्षभरात ७७ ठिकाणी शासकीय अधिकारी-कर्मचायांवर हल्ला करण्यात आल्याच्या घटना ठाणे पोलीस आयुक्तालय वारीत घडल्या आहेत. दाखल गुन्ह्यात सर्वाधिक हल्ले पालिका व बीज वितरण कर्मचान्यांवर इवलेले आहेत
ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या कल्याण फाटा येथील अतिक्रमण प्रतिबंध मोहिम कारवाई करण्यास गेलेले ठाणे महापालिकेचे सहाय्यक अत्युक्त भालचंद्र घुगे यांना मारहाण झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अब्दुला शाह आलम खान (२७) आणि शाहआलम शाहबान खान (६३) या दोघांना डायघर पोलिसांनी अटक केली आहे. परंतु, शासकीय अधिकाण्यास पोलीस बंदोबस्तात असताना देखील मारहाण करण्याइतपत अतिक्रमण धारकांची मजल गेल्याने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हाेणाऱ्या हल्ल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कासावडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका माथेफिरू फेरीवाल्याने चाकू हल्ला केल्याची घटना काही वर्षापूर्वी पडली होती. या हल्ल्यात पिंपळे व त्यांच्या बॉडीगार्डला आपली बोटे गमवावी लागली होती. महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारे भ्याड हल्ला झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. तर शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रत्र ऐरणीवर आला होता. त्यानंतर देखील ठाण्यात अनेक ठिकाणी शासकीय कर्मचा-यांवर हल्ला झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, कर्तव्यावर असलेल्या अधिकान्यासह कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांकडून हल्ला होण्याची ही ठाण्यातील पहिली वेळ नव्हे, तर यापूर्वी देखील मुजोर फेरीवाल्यांनी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या घटना बदल्या आहेत
शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाईची कायद्यात कठोर तरतूद करण्यात आली आहे. शासकीय कर्मचा-यांवर हल्ले करणाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची वेगळी नोंद पोलीस ताण्यात करण्यात येते त्याच प्रमाणे शासकीय व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा तर मिळतेच परंतु, इतर कुठलेही शासकीय लाभ त्यास अजीवन नाकारण्यात येतात. शासकीय परवाना, पासपोर्ट मिळणे अवघड जाते. इतकेच नव्हे तर शासकीय नोकरी अथवा इतर कुठल्याही कामासाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवताना देखील या गुन्ह्यांची विशेष दखल घेतली जाऊन हल्ला करणाऱ्या व्यक्तीस लाभ नाकारला जातो. त्यामुळे शासकीय कर्मचान्यांवर हल्ला करणणे अतिशय गंभीर गुन्हा समजला जातो
काही महिन्यांपूर्वीच ठाणे पालिकेच्या अंतर्गत असलेल्या मंत्रा येथे बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाई करण्यास गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयान एका आरोपीने केला होता. त्यापूर्वी देखील पालिकेचे तत्कालीन उपायुक्त संदीप माळची यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. गेल्या काही वर्षात फेरीवाल्यांकडून पालिका अधिकारी व कर्मचान्यांवर सतत हप्ते होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, पोलीस दसरी होणारी नोंद शोधली असता ठाण्यात जानेवारी ते डिसेंबर २०२४ या काळात ७७ ठिकाणी सारसकीय अधिकारी व कर्मचा-यांवर हल्ला करण्यात आल्याचा घटना घडल्या आहेत. त्यापैकी ७५ गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून २ घटनांमधील आरोपी अद्याप देखील फरार आहेत. एककीकडे गुन्हेगारी कमी करण्यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना शासकीय कर्मचा-यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सर्वाधिक हल्ले पालिका व वीज वितरण कर्मचाऱ्यांवा झाल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे.