Thane : दिव्यात ६१ बेकायदा शाळांचा सुळसुळाट

विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; यादी महापालिकेला सादर
School
Schoolfile photo

ठाणे : अनधिकृत बांधकामांसाठी बदनाम असलेल्या दिव्यात आता बेकायदा शाळांचा देखील सुळसुळाट झाला आहे. गेल्या वर्षी असलेल्या ४० बेकायदा शाळांमध्ये यावर्षी आणखी २१ शाळांची भर पडली असून हा आकडा आता ६१ वर गेला आहे. महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोशिएशन या संस्थेने दिव्यातील अनधिकृत शाळांची यादीच ठाणे महापालिकेला दिली आहे. मात्र अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी धजावत नसलेल्या ठाणे महापालिकेने बेकायदा शाळांची यादी असताना या शाळांवरही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शहरातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिध्द केली जाते. या शाळांमध्ये पाल्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवू नये असे देखील सांगितले जाते. महापालिका हद्दीत आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळा असून यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आकडा अधिकचा अस लेला दिसून आला आहे. सध्या इंग्रजी शाळांना चांगली मागणी असल्याने नावजलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रत्येक पाल्याला आपल्या मुलाला टाकणे शक्य होत नाही, त्यामुळे याचाच फायदा घेत झोपडपट्टी भागात अशा शाळांचे प्रमाण वाढत आहे.

दिव्यात आजच्या घडीला ६१ शाळा या बेकायदा असल्याचा दावा मेस्टा या संघटनेने केला आहे. विशेष म्हणजे या ६१ बेकायदा शाळांची यादी पुराव्यासह संस्थेने ठाणे महापालिकेला सादर केली आहे. यासंदर्भात त्यांनी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाला अनेकवेळा स्मरणपत्रे देखील पाठवली आहेत. मात्र पालिकेच्या शिक्षण विभागाला याचे गांभीर्यच नसल्याने शिक्षण विभागाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई या शाळांवर झालेली नाही. यापूर्वी काही शाळांवर कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र पुन्हा या शाळा सुरु झाल्या असून ही संख्या कमी होण्याच्या ऐवजी आता वाढली असून ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळेच या बेकायदा शाळांना अभय मिळत आहे. पालिका प्रशासन लवकरात लवकर या शाळा बंद करून भ्रष्ट अधिकार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या शाळा बंद होत नाही तोपर्यंत आमरण उपो- षणाला बसणार असल्याचा इशारा देखील संघटनेकडून देण्यात आला आहे. शाळा अधिकृत आहे कि अनधिकृत याची माहिती पालकवर्गात नसल्याने या बेकायदा शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्यच आता धोक्यात सापडले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news