Thane Water Cut: ठाण्यात बुधवारी काही भागात ४८ तास पाणीपुरवठा बंद

नागरिकांचे मात्र चांगलेच हाल होण्याची शक्यता आहे.
Thane Water Cut
Thane Water CutPudhari
Published on
Updated on

ठाणे: लांबलेला पाऊस त्यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई लक्षात घेऊन ठाण्यातील काही भागांमध्ये बुधवारपासून पुढे ४८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारे शटडाऊन घेतला जात असून बुधवार पासून देखील ४८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांचे मात्र चांगलेच हाल होण्याची शक्यता आहे.

Thane Water Cut
Fishing Ban till August: मासेमारी बंदीला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

ठाणे महानगरपालिकेस मे. स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा होत असून संभाव्य पाणी टंचाईचे संकट विचारात घेता, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभागाने हे निर्देश दिले आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी ९ पासून गुरुवारी सकाळी वाजेपर्यंत असा २४ तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवावा असे स्टेम प्राधिकरणाने कळविले आहे.

त्यानुसार सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी वाजेपर्यंत मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आले असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

Thane Water Cut
Chembur Water Shortage: चेंबूरच्या काळारोड भागात महिनाभरापासून पाणीबाणी; टँकरने पाणीपुरवठा

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news