Tet paper leak case : टीईटी पेपरफुटीचे 'विद्यार्थी कनेक्शन' उघड, परीक्षार्थींची यादी सापडली

यादीत कोण कोण? पोलिसांची कसून चौकशी, दोघांच्या कोठडीत वाढ
Tet paper leak case
Tet paper leak casepudhari photo
Published on
Updated on

भिवंडी : संजय भोईर टीईटी पेपरफुटी प्रकरणातील फरार असलेल्या प्रकाश मिसाळ (रा. बीड) आणि अशोककुमार बाबूलाल शाव (रा. दिल्ली) या दोघा आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाकडून पाच दिवसांची वाढ केली आहे. या दोन्ही आरोपींकडून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून, त्यांच्या ताब्यातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांची यादी सापडल्याने तपास यंत्रणेकडून त्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे.

टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी प्रकाश मिसाळ आणि अशोककुमार बाबूलाल शाव यांना २० सप्टेंबर रोजी अटक केली होती. अटकेनंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या कालावधीत तपास पथकाने दोन्ही आरोपींकडे चौकशी करत पेपरफुटी प्रकरणातील त्यांच्या भूमिकाबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली.

Tet paper leak case
Ulhasnagar nominated corporators election stay : उल्हासनगरमधील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणूक प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

बुधवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर तपासाची माहिती साद करत आरोपींकडून परीक्षार्थी विद्यार्थ्यांची यादी सापडल्याचे सांगितले. या यादीतील विद्यार्थ्याचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, त्यांच्यापर्यंत परीक्षेतील माहिती अथवा प्रश्नपत्रिका पोहोचली होती का, तसेच या यादीच्या आधाराने आणखी कोणाचा सहभाग समोर येतो का, याचा तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रे व इतर माहितीची पडताळणी करणे, विद्यार्थ्यांच्या यादीतील नावे तपासणे तसेच या संपूर्ण प्रकरणातील आरोपींच्या परस्पर संबंधांचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी आणखी पोलिस कोठडीची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य करत दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे.

Tet paper leak case
Navi mumbai road accidents : नवी मुंबईत बारा वर्षांत ३४४० जणांचे अपघाती बळी

१८ आरोपी अटकेत

  • टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असून आतापर्यंत एकूण १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पेपरफुटीची माहिती कोणत्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचली, त्यामध्ये कोणाकोणाची भूमिका होती आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी या प्रकरणातील आरोपीचा नेमका संबंध काय होता, या विविध बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

  • दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून तब्बल ३५०० पानांचे दोषारोपपत्र भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास मोठ्या प्रमाणावर झालेला असतानाच नव्याने अटक करण्यात आलेले प्रकाश मिसाळ आणि अशोककुमार शाव यांच्या चौकशीतून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतात का, याकडे लक्ष लागले आहे. त्यांच्या ताब्यातून मिळालेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या यादीमुळे तपासाची दिशा आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news