Thane | शिक्षणगंगेसाठी विद्यार्थ्यांना तुडवावी लागतेय चिखलाची वाट

स्वातंत्र्यानंतरही डोंगरीपाड्याला विद्यार्थ्यांच्या नशीबी चिखलमय वाट
kasa dhanu palghar
कासा ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या डोंगरीपाडा येथील विद्यार्थ्यांना चिखलमय वाट तुडवत शाळेत जावे लागत आहे.file photo

कासा : डहाणू तालुक्यातील गजबजलेली अशी कासा ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या डोंगरीपाडा पश्चिमेकडील नागरिकांना येण्या जाण्यासाठी साधा रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखलाची पायवाट तुडवत शाळा, बाजारपेठ गाठावी लागत आहे.

Summary

देशाच्या स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव एका बाजूला साजरा करत असताना ग्रामीण भागातील वीज, रस्ते, पाणी, आरोग्य या मुलभूत सुविधांचा सामना आदिवासी भागातील नागरिकांना करावा लागत आहे.

कासा ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरीपाडा पश्चिम, सोनाळे व चारोटी कडून येणार्‍या रस्ता नसल्याने विद्यार्थी, नागरिक व वयोवृद्ध यांना चिखलातून कासा येथे यावे लागते. याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करून आम्हाला रस्त्याची सोय करून द्यावी.

अजय तुंबडा, स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते.

कासा गावाच्या हद्दीतील डोंगरीपाडा पश्चिमेकडील नागरिकांना, चारोटी धापशीपाडा, सोनाळे खूबरोखपाडा येथील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना कासा येथे बाजारपेठ, दवाखाना, शाळेतील विद्यार्थ्यांना येण्यासाठी चिखलातुन अर्धा किमी पर्यंतचे अंतर हे चिखलाची पायवट तुडवत यावे लागते. मात्र याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विचारणा केली असता, या पाड्यासाठी मागील काही वर्षांपूर्वी रस्ता मंजूर करण्यात आला होता, मात्र ज्या जागेमधून रस्ता मंजूर झाला होता ती जागा एका खासगी व्यक्तीची असून त्या जागा मालकाच्या आडमुठीपणामुळे जागा मिळत नसल्याने रस्ता बनू शकला नाही. परंतु आतापर्यंत पुन्हा याबाबत प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी याबाबत कोणत्याही प्रकारे यांच्यावर ठोस उपाययोजना न केल्याने येथील विदयार्थी व नागरिक यांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहेत, याबाबत विद्यार्थी आणि नागरिक यांना विचारणा केली असताना त्यांनी नाराजी व्यक्त करत येणार्‍या वर्षी तरी रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी केली आहे. डहाणूच्या दुर्गम भागात मुसळधार पावसात पूरजन्य परिस्थितीतही पाण्यातून जीवघेणा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे.

कासा ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरीपाडा पश्चिमेकडील काही लोकवस्ती असणार्‍या नागरिकांना येण्यासाठी रस्ता नाही. येथील एका जागा मालकाच्या अडचणीमुळे रस्ता तयार होऊ शकला नाही. मात्र याबाबत लवकरात लवकर तोडगा काढून ग्रामस्थांना रस्त्याची सोय करून देण्यात येईल.

सुनीता कामडी, लोकनियुक्त सरपंच, कासा ग्रामपंचायत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news