Student Ulgulan March : विध्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा मुंबईच्या वेशीवर!

आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनामा साठी विध्यार्थी आक्रमक, नाशिकहून मुंबईकडे निघाला मोर्चा
Student protest : विध्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा मुंबईच्या वेशीवर!
Student protest : विध्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा मुंबईच्या वेशीवर!
Published on: 
Updated on: 

कसारा : आपल्या विविध  मागण्यासाठी  नाशिकुहून मुंबईकडे निघालेला विध्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा आज ठाण्याच्या वेशीवर येऊन धडकला. आज कसारा घाटातून कसारा येथे  पायी मोर्चात सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनीं ना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले काही विद्यार्थ्यांना चक्कर आली तर काहींच्या पायांना फोड आले.

नाशिकमधून २८ सप्टेंबर २०२६ रोजी आदिवासी विद्यार्थी आणि सकल आदिवासी समाजातर्फे आश्रमशाळांमधील समस्या व विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई राजभवनाकडे 'उलगुलान' लाँग मार्च काढण्यात आला असून हा मोर्चा आज ठाणे जिल्ह्याच्या वेशिवर म्हणजेच कसारा घाट मार्गे कसारा येथे दाखल झाला असून आज कसारा येथे मुक्काम ठोकला.

  मोर्चा मध्ये सहभागी शेकडो  विध्यार्थ्यानी  आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्याच बरोबर  आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये निकृष्ट भोजन आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे मध्यवर्ती किचन बंद करावे व आश्रम शाळेतच मुलांना ताजे व सकस आहार द्यावा तसेच नंदुरबार जिल्ह्यातील : शासकीय आश्रमशाळांमध्ये विध्यार्थिनींना साप चावून मृत्यू झाला या  मृत्यूच्या घटनां चा निषेध करीत आश्रम शाळेत मयत झालेल्या मुलींच्या वारसांना एक कोटी रुपये  द्यावे.अशी अग्रही मागणी देखील मोर्चा मधील सहभागी विद्यार्थ्यांनी केली आहे. हा मोर्चा राजभवनवर धडकणार आहे

दरम्यान या आंदोलनात सहभागी झसलेले शदकडो आदिवासी विध्यार्थी विध्यार्थिनी अल्पवईन असल्याने पायी प्रवास करताना एक एक विद्यार्थी आजारी पडत आहे इगतपुरी ते कसारा दरम्यान चार मुलींना व तीन मुलांना चक्कर आल्याच्या घटना घडल्या तर एक मुलगी जागीच बेशुद्ध पडली होती सर्वांवर इगतपुरी व कसारा येथील वैद्यकीय पथकाने उपचार केले आहे  उपचार केले आहे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आमच्या शिष्ट मंडळाची बैठक झाली मात्र या बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्याने आम्ही शेकडो विध्यार्थी येत्या ५ तारखे पर्यत राजभावनावर धडकणार आहोत.- राहुल पावरा आंदोलक

आंदोलक विध्यार्थी.निष्ठुर सरकारचा निषेध.आम्ही ४२ दिवसापासून आमच्या मागण्यासाठी नाशिकला आंदोलन करीत आहोत तरी देखील कोणी दखल घेतली नाही अखेर आम्ही २८ सप्टेंबर पासून पायी मोर्चा काढला असून शेकडो विध्यार्थी विध्यार्थिनी या मोर्चात सहभागी झाले  असून या निष्ठुर सरकारचा निषेध आम्ही या अंदोलना दरम्यान करणार असून आमच्या मागण्या मान्य  न झाल्यास मुंबईत तीव्र आंदोलन करणारे आहोत.- धनश्री पराडके.आंदोलक विध्यार्थी.

दरम्यान शेकडो आंदोलकांच्या सुरक्षेसाठी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक राठोड उपविभागीय अधिकारी निखिल विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सुरेश गावीत, महामार्ग पोलीस अधिकारी होंडे यांनी   चोख बंदोबस्त तैनात केला होता तर वैद्यकीय उपचार तात्काळ मिळण्यासाठी इगतपुरी व कसारा येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय पथक कार्यरत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news