MSRTC Tirthatan Scheme | 'एसटी'च्या तीर्थाटन योजनेचे खासगीकरण; सहा प्रादेशिक पर्यटन संस्थांची होणार निवड

भाविकांना सुरक्षित, किफायतशीर आणि सर्वसमावेशक तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध होऊन
MSRTC
MSRTC (Pudhari Photo)
Published on
Updated on

Pratap Sarnaik on MSRTC Tirthatan Scheme

ठाणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन' योजनेला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी खासगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. हा खासगीकरणाचा प्रयोग दोन वर्ष प्रयोगिकतत्वावर राबविण्याच्या निर्णयामुळे राज्यातील हजारो भाविकांना सुरक्षित, किफायतशीर आणि सर्वसमावेशक तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध होऊन एसटी महामंडळालाही अतिरिक्त महसूल मिळेल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, नव्या धोरणानुसार तीर्थाटन,व धार्मिक सहलींचे नियोजन, निवास, भोजन, स्थानिक पर्यटन, मार्गदर्शक, टोल, पार्किंग, प्रवेश शुल्क आदी सर्व पूरक सुविधा खासगी पर्यटन संस्थांकडून पुरविण्यात येतील. मात्र, बस सेवा, प्रवासी वाहतूक आणि प्रवासभाड्याचे संपूर्ण उत्पन्न एसटी महामंडळाकडेच राहणार आहे. त्यामुळे भाविकांना सर्व सुविधा 'वन-स्टॉप' पद्धतीने उपलब्ध होतील आणि एसटीच्या उत्पन्नालाही चालना मिळेल.

MSRTC
MSRTC Smart Card: एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला रायगडमध्ये अल्पप्रतिसाद; चार महिन्यांत फक्त ७ हजार कार्ड वितरीत

या योजनेअंतर्गत बस आरक्षणासाठी प्रत्येक बसमध्ये बसच्या आसनक्षमतेनुसार प्रवासी असणे बंधनकारक राहील. शासनाच्या विविध सामाजिक घटकांना लागू असलेल्या प्रवास सवलती या योजनेतही लागू राहतील. त्यामुळे खासगी पर्यटन संस्थांच्या तुलनेत या योजनेतील प्रवास खर्च तुलनेने कमी असेल.

तसेच या सुविधांमधून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी किमान १० टक्के हिस्सा एसटी महामंडळाला देणे त्यांच्यासाठी बंधनकारक असेल. ही योजना राज्यातील मराठी तरुण-तरुणींसाठी रोजगार आणि उद्योजकतेचे नवे दालन खुले करणारी योजना ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MSRTC
MSRTC Pratap Sarnaik : महिनाभरात एसटीचा उत्पन्न वाढवा, अन्यथा कारवाई : परिवहन मंत्री सरनाईक यांचा इशारा

भाविकांच्या श्रद्धेला सेवाभावाची जोड आणि एसटीच्या आर्थिक बळकटीला नवा आधार' या दुहेरी उद्देशाने राबविण्यात येणारी ही योजना राज्यातील धार्मिक पर्यटनाला नवी दिशा देण्याबरोबरच एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठीही प्रभावी ठरेल

- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news