Virar News: हिंदी-भोजपुरीत बोल, मराठी चालणार नाही; विरारमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकाने तरुणाला धमकावलं, व्हिडिओ व्हायरल

Virar Rickshaw Driver News: रिक्षाचालकाने मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर Viral
Virar News
Virar NewsPudhari
Published on
Updated on

Rickshaw driver in Virar threatens youth for speaking Marathi

विरार : विरार स्टेशन परिसरात एका परप्रांतीय रिक्षाचालकाने मराठी भाषेत बोलण्यावरून एका दुचाकीस्वार तरुणाला दमदाटी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘भोजपुरी किंवा हिंदीत बोल,’ अशी सक्ती करत या रिक्षाचालकाने मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत असून या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Virar News
Mira Bhayander Morcha Pratap Sarnaik | मोर्चेकऱ्यांकडून 'गो बॅक'ची नारेबाजी, अंगावर बाटली फेकली, प्रताप सरनाईकांचा मोर्चातून काढता पाय

मिळालेल्या माहितीनुसार, विरार स्टेशन पश्चिमेकडील गजबजलेल्या परिसरात एका क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालक आणि एका दुचाकीस्वार तरुण यांच्यात वाद झाला. यावेळी दुचाकीस्वाराने मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, रिक्षाचालकाने त्याला अडवून मुजोरी करण्यास सुरुवात केली. मराठी भाषेचा सन्मान करण्याऐवजी रिक्षाचालकाने दुचाकीस्वार मराठी तरुणालाच हिंदी आणि भोजपुरी भाषेत बोलण्याची सक्ती केली. हा वाद वाढत गेल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

व्हिडिओमुळे मुजोरी उघड

या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिक्षाचालक अत्यंत आक्रमकपणे तरुणावर ओरडताना दिसत आहे. ‘येथे मराठी चालणार नाही, हिंदी किंवा भोजपुरीमध्ये बोल,’ असे म्हणत तो तरुणाला धमकावत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत आहे. तरुणाने शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करूनही रिक्षाचालकाचा आक्रमक पवित्रा कायम असल्याचे व्हिडिओमध्ये चित्रित झाले आहे.

Virar News
Virar-Alibagh Corridor : विरार-अलिबाग कॉरिडोरला मिळणार गती

ज्याला धमकावलं तोही मूळचा उत्तर प्रदेशचाच

विरारमध्ये ज्या तरुणाला परप्रांतीय रिक्षाचालकांनी धमकावलं तो तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. भावेश गडौलिया असे या तरुणाचे नाव असून त्याचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे.

त्याचे पणजोबा हे गिरणी कामगार होते. सध्या भावेश आणि त्याचे कुटुंबीय विरारमध्येच राहतात. सोमवारी भावेश आणि त्याची बहीण दुचाकीवरून जात होते. या दरम्यान, एका भरधाव रिक्षाचालकाने भावेशला ओव्हरटेक केले. यात तोल जाऊन पडण्याची शक्यता होती. शेवटी भावेशने कशीबशी दुचाकी थांबवली आणि रिक्षाचालकाला जाब विचारला.

यावरुन रिक्षाचालकाने भावेशसोबत हुज्जत घालायला सुरूवात केली. यावर भावेशने रिक्षाचालकाला हिंदीत बोला अशी विनंती केली असता वाद चिघळला. शेवटी तिथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांनी वाद मिटवला.

महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी असल्याने माझा मित्रपरिवारही मराठी भाषिक होता. त्यामुळे मला मराठी भाषा लिहिता, बोलता येते. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे, असे आवाहन भावेशने केले आहे. मुजोर परप्रांतीय रिक्षाचालकांविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचेही त्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news