ठाणे : कल्याण-डोंबिवलीतून गणेशोत्सवासाठी कोकणात सहाशे बसेस रवाना

कल्याण-डोंबिवलीतून गणेशोत्सवासाठी कोकणात सहाशे बसेस रवाना
Ganesh Chaturthi 2025
गणेशोत्सवासाठी कोकणात आजपासून जादा फेर्‍यांना सुरुवातfile photo
Published on
Updated on
कल्याण : सतीश तांबे

कोकणातील चाकरमान्यांना गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी डोंबिवलीमधून 250, तर कल्याण मधून 350 बसेस अशा 600 बसेस रवाना झाल्या आहेत.

डोंबिवली शहर व ग्रामीण भागातील चाकरमानी कोकणी बांधवांना आपल्या गावी कोकणात जाण्यासाठी राज्यातील विविध डेपोतील जादा एसटी बसेस दाखल झाल्या. शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून बुधवारी डोंबिवली शहरातून 125 तर डोंबिवली ग्रामीण भागातून 105 अश्या 230 एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, दिवा शहरातून 350 एसटी कोकणात रवाना होणार आहेत. शहराच्या विविध भागातून सोडलेल्या बसेसना स्थानिक नेत्यांनी झेंडा दाखवून मार्गस्थ केल्याने ठाणे उपनगरातील परिसरात गणेश भक्तांच्या गावी जाणार्‍या तयारीने गणेशोत्सवाचा माहोल बनला होता.

37 हजार प्रवाशांची व्यवस्था

शहरातील अन्य भागातून ही कोकणातील रत्नागिरी, संगमेश्वर, दापोली, चिपळून, राजापूर, सिंधुदुर्ग, मालवण, तसेच कोल्हापूर आदी भागात एसटी बसेस सोडण्यात आल्या. या माध्यमातून 37 हजार प्रवाशांची कोकणात जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसर्‍या दिवशी गुरुवारी कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, दिवा शहरातून 350 एसटी बसेस कोकणात रवाना झाल्या. कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी, विजय नगर, काटेमानवली, विजय नगर, तिसगांव, विठ्ठलवाडी खंडेगोलवली आदी भागातील कोकणी बांधवांसाठी कल्याण शहराच्या विविध भागातून मोफत एसटी बसेस शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सोडण्यात आल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news