

नेवाळी ( ठाणे ) : कल्याण ग्रामीण भागातील पत्रकारावर गावगुंडांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गावागावातील बातम्या प्रकाशित करत असल्याने मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शिळ डायघर पोलीस ठाण्यावर धडक दिली आहे. पोलिसांनी देखील वैद्यकीय उपचारासाठी जखमी पत्रकाराला रुग्णालयात दाखल करण्याची समज दिली आहे.
शिळफाटा चौकात शुक्रवारी (दि.28) रोजी दुपारच्या सुमारास पत्रकाराला मारहाण करण्यात आली आहे. शिळं गावातील भ्रष्टाचारच्या बातम्या प्रकाशित करत असल्याने गुंडांनी मारहाण केली आहे. सध्या जखमी पत्रकारावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.