

ठाणे : बाबासाहेबांना शेवटच्या दिवसांत त्यांनी किती त्रास दिला हे सगळ्यांना माहित आहे. राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोलले आहेत. औरंगजेबाने सत्तेसाठी आपल्या भावांचा काटा काढला. उध्दव ठाकरे यांनी वेगळं काय केलं ? असा प्रश्न करीत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब असल्याची बोचरी टीका केली.
शिवसेना विरुद्ध शिवसेना असा आरोपप्रत्यारोपाचा धुरळा उडत आहे. त्यात औरंगजेबाच्या कबरीचा वाद राज्यात पेटला असताना शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब असल्याचा घणाघात केला. कुरकर्मा औरंगजेब यांनी जसे वडील, भावांना त्रास दिला तसा उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब आणि भावांना त्रास दिला आहे.
जो आपल्या भावांचा होऊ शकला नाही तो जनतेचा काय होणार असे बोलत नरेश म्हस्के यांनी ठाकरे यांनी विचारांचा वारसा मिळावा यासाठी नाही तर बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीसाठी आपल्या सख्ख्या भावांना पध्दतशीरपणे दूर केले आहे. बाळासाहेबांची वैचारीक संपत्ती त्यांनी सोडली . पण इतर प्रॉपर्टीसाठी भावासोबत दावा मांडला. हा दावा कोर्टात गेला.
बाबासाहेबांना अखेरच्या दिवसांत त्यांनी त्रास दिलाच पण त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या दुश्मनांसोबत हातमिळवणी करून आताही यातना देत आहेत,असेही त्यांनी यावेळी नमूद केले.