Thane Mayor 2026 | ठाण्याच्या महापौर पदी शर्मिला पिंपोळकर...

उपमहापौर पदी भाजपच्या कृष्णा पाटील यांची वर्णी ...
Thane mayor news
Thane mayor news
Published on
Updated on

ठाणे : ठाण्याच्या महापौर पदासाठी अनेक नावांची चर्चा होती, मात्र कोपरी परिसरातील नगरसेविका शर्मिला पिंपोळकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. महापौर पदाच्या रेसमध्ये वागळे मधून दर्शना जानकर तसेच वर्तकनगर मधून विमल भोईर यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र महापौर पदासाठी आज नामनिर्देशन दाखल करण्यात आले असून पिंपोळकर यांचे नाव निश्चित झाले आहे.

तर दुसरीकडे भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय बसण्यात गुंडाळला असून सत्तेत सामील होत उपमहापौर पदी कृष्णा पाटील यांची वर्णी भाजपने लावली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत आता शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असे सत्तेचे समीकरण असणार आहे.

नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाले आहे. शिवसेनेचे ७५ नगरसेवक निवडून आले असून भाजपचे २८ नगरसेवक निवडणून आले आहेत. त्यामुळे महापौर पदी शिवसेनेचाच महापौर बसणार हे निश्चित झाले होते. महापौर पदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्याने महापौर पदासाठी दर्शना जानकर,विमल भोईर,पद्मा भगत आणि शर्मिला पिंपोळकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आज महापौर पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात आले. यामध्ये महापौर पदासाठी शर्मिला पिंपोळकर तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या कृष्णा पाटील यांनी आपले नामनिर्देशन दाखल केले. यामध्ये शर्मिला पिंपोळकर यांचे नाव निश्चित करण्यात आले तर उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांची वर्णी लागली आहे.

शिवसेनेचे एकूण ७५ नगरसेवक आणि भाजप पक्षाचे २८ नगरसेवक निवडून आले आहेत.अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी यांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दिला आहे त्यामुळे शिवसेनेचे ७६ नगरसेवक झाले आहेत.शर्मिला पिंपोळकर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या कोपरी पाचपाखाडी परिसरातून निवडून आल्या असून शर्मिला ठाण्याच्या महापौर पदी शर्मिला पिंपोळकर यांची वर्णी लागल्याने कोपरीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विरोध गुंडाळून भाजप सत्तेत सामील...

ठाणे महापालिकेत योग्य पद मिळाले नाही तर विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपने आपला निर्णय बासनात गुंडाळला. ठाण्याच्या उपमहापौर पदी भाजपच्या कृष्णा पाटील यांची वर्णी लागली आहे. सत्तेत महत्वाचा वाटा मिळावा यासाठी महत्वाच्या समितीवर भाजपने मागणी केली आहे. यामध्ये स्थायी समिती, परिवहन समिती,शिक्षण मंडळ ,विषय समित्या ,प्रभाग समितीमध्येही भाजप आजही आग्रही आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news