Thane Monkey Attack : कलगांवमध्ये हल्लेखोर माकडाचा उच्छाद

चिमुकल्यांसह दहाजणांचे लचके तोडले; वन विभागाने केले माकडाला जेरबंद
Thane Monkey Attack
Thane Monkey Attackpudhari photo
Published on: 
Updated on: 

आसनगाव : शहापूर तालुक्यातील दहिवली परिमंडळाच्या कळगांव वनपरिक्षेत्रात ९ नोव्हेंबर पासून एका हल्लेखोर माकडाने उच्छाद मांडला होता. परिसरातील ग्रामस्थांनी ऐन दिवाळीच्या सणात आगमन झालेल्या वानरराजाचे चिवडा, फराळ, करंजी, लाडू यासारखे फराळ देऊन स्वागत केले. मात्र ग्रामस्थांनी दाखवलेली सहानुभूती या माकडराजाच्या अंगी पडली नाही.

९ नोव्हेंबर पासून आगमन केलेल्या या हल्लेखोर माकडाने येथील चिमुकल्यांसह जवळपास दहा जणांचे हिंस्त्र पद्धतीने चावा घेऊन अक्षरशः लचके तोडले आहेत. यामुळे येथील ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले होते मात्र दहिवली परिमंडळाचे वनाधिकारी शरद रसाळ यांनी शहापूरचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या मार्गदर्शनाखाली १३ नोव्हेंबर रोजी रेस्क्यू टीमला प्राचारण करून या हल्लेखोर माकडाला शहापूर तालुक्यातील घरत पाडा येथे जेरबंद केल्याने कलगांव परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Thane Monkey Attack
Vaitarna River Bridge : मुंबई, ठाण्यासह गुजरातच्या प्रवासाला मिळणार गती

या हल्लेखोर माकडाने प्रेमा वाघ (२), ओवी भोईर (३), प्रेम घरात (८), विकास घरत (८), प्रशांत भोईर (२९), महेश पवार (२८), श्रेया कथोरे (१३), प्रथमेश घरत (३), कान्हाबाई घरात (७२), श्रीशांत घरत (१) या चिमुकल्यांसह १० जणांच्या पायाला, हाताला त्याचबरोबर एका चिमुकल्याच्या तोंडाला चावा घेतल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. यातील काही जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचरण केलेल्या वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या रेस्क्यू टीमचे रोहित मोहिते, अनिकेत कदम व त्यांचे सहकारी आणि दहिवली परिमंडळाचे वनाधिकारी शरद रसाळ, शहापूर वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर वनरक्षक जय गावंडे, गणेश भांगरे, वनमजूर दशरथ निचिते, राम तिवरे, बुधाजी शीद यांच्या अथक परिश्रमामुळे आणि प्रसंगावधानणे या हल्लेखोर माकडाला पकडण्यात वन विभागाला यश मिळाल्याने स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Thane Monkey Attack
Marathi Diwali Ank History : मराठी दिवाळी अंक संस्कृती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.