Thane | सारखे ओरडते, घाण करते म्हणून तिने पिल्लावर काढला राग; तान्ह्या मांजराचा मृत्यू

किती निर्दयी! पिल्लाला पाचव्या मजल्यावरून फेकले; तान्ह्या मांजराचा मृत्यू

Kitten
मांजरीचे पिल्लूfile photo
Published on
Updated on

डोंबिवली : सारखे ओरडते आणि घाण करते म्हणून पश्चिम डोंबिवलीतील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेने अडीच महिन्याच्या तान्ह्या मांजराच्या पिल्लावर अमानुषपणे राग काढला. या पिल्लाला मानगुटीला पकडून अक्षरश: इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून तळमजल्यार फेकून दिले. जमिनीवरील लाद्यांवर आपटल्याने पिल्लाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये सदर महिलेच्या अमानुष कृत्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर या घटनेनंतर सदर महिलेच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Summary

सोसायटी परिसरातील लहान मुले या मांजराच्या पिल्लाशी खेळत असत. या पिल्लाला माणसांचा लळा लागल्याने ते सारखे म्यॉवम्यॉव करत असे. ते पिल्लू ओरडते आणि घाण करते म्हणून महिलेने अडीच महिन्याच्या तान्ह्या मांजराच्या पिल्लावर अमानुषपणे राग काढला. या पिल्लाला मानगुटीला पकडून अक्षरश: इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून तळमजल्यार फेकून दिले.

या महिलेला नवीन फौजदारी कायद्याने कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी प्राणी प्रेमींनी केली आहे. डोंबिवलीतील फॅक्स फाऊंडेशन संस्थेच्या पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्त्या रेखा रेडकर यांनी या मांजराच्या मृत्यूप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात मांजराच्या पिल्लाला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून फेकून देण्याची ही घटना पश्चिम डोंबिवलीतील आनंदनगर परिसात असलेल्या हिमालय आशीष समोरच्या सुंदरा पॅलेसच्या इमारत क्रमांक तीनमध्ये शुक्रवारी रात्री घडली आहे. तक्रारदार रेखा रेडकर या सुंदरा पॅलेस सोसायटीच्या परिसरात आत्मज सोसायटीत राहतात.

या संदर्भात पोलिसी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरा पॅलेस सोसायटीच्या आवारात एक अडीच महिन्याचे मांजराचे पिल्लू वावरत होते. सोसायटीच्या परिसरातील रहिवासी या मांजराच्या पिल्लाला खाण्यास देत असत. सोसायटी परिसरातील लहान मुले या मांजराच्या पिल्लाशी खेळत असत. या पिल्लाला माणसांचा लळा लागल्याने ते सारखे म्यॉवम्यॉव करत असे. मात्र पिल्लाचा सोसायटीतील वावर सहन न झाल्याने सुंदरा पॅलेसमध्ये राहणाऱ्या एका अज्ञात महिलेने शुक्रवारी (दि.५) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मानगुटीला पकडले आणि मागचा पुढचा विचार न करता त्याला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून इमारतीच्या तळ मजल्यावर फेकले. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ही माहिती तात्काळ फॅक्स फाऊंडेशनच्या रेखा रेडकर यांना दिली. रेडकर यांनी पोलिसांना ई-मेलद्वारे माहिती दिली. या माहितीची विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी दखल घेऊन पोलिसांच्या पथकाला तत्काळ घटनास्थळी पाठविले.

या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून पिल्लाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर हा प्रकार करणाऱ्या एका अज्ञात महिलेच्या विरोधात प्राण्यांचा छळ व बळी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक के. पी. कुमटकर आणि त्यांचे सहकारी महिलेचा शोध घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news