

ठाणे : स्काऊट गाईड शिबिरासाठी गेलेल्या ठाण्यातील १६ विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास अक्षरशः संकटात सापडला. परतीची रेल्वे चुकली, खासगी बस मालकाने ३५ हजार रुपये घेऊन पोबारा केला आणि रात्री अपरिचित ठिकाणी रस्त्यावर उतरवले. त्यानंतर विद्यार्थ्यांना एका धर्मशाळेत आश्रय घ्यावा लागला. दोन दिवस विद्यार्थी व शिक्षक लखनौमध्ये अडकून पडले होते. अखेर तातडीच्या प्रयत्नांतून त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. आता हे सर्व विद्यार्थी सोमवारी सकाळच्या विमानाने मुंबईत परतणार आहेत.
ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदिर शाळेतील सातवी ते नववीचे स्काऊट गाईडचे १६ विद्यार्थी आणि दोन शिक्षक कॅम्पसाठी लखनौ येथे गेले होते. लखनौ येथून हे सर्वजण २८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.१५ वाजता रेल्वेने परतीच्या प्रवासाला निघणार होते. मात्र स्थानकावर पोहोचण्यास उशीर झाल्याने त्यांची ती रेल्वे चुकली. परिस्थिती हाताळण्यासाठी शिक्षकांनी घाईघाईत एका खासगी ट्रॅव्हल्सची बस पकडली. बस मालकाने ३५ हजार रुपये घेतले;