

ठाणेः विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राच्या परिसरात विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थिनींना अनेक दिवस बलात्काराच्या धमक्या येत आहेत. तसेच अश्लील मजकूर असलेली पत्रे त्यांच्या वर्ग खोलीत व बॅगेत आढळला आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ५ डिसेंबर रोजी ठाणे उपकेंद्र प्रमुखांकडे तक्रार केली होती. . अभाविप ने मा. कुलगुरु यांची भेट घेत त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आणून दिला त्यावेळी त्यांनी यावर चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस व विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करणे अपेक्षित होते.याउलट उपकेंद्र प्रमुख विद्यार्थिनींवर दबाव टाकत असून सदर प्रकरण मिटवू पाहत आहेत. या घटनेला सात दिवस होऊन गेले असता यावर ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थीनी मध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून विद्यापीठाने सर्व विद्यार्थिनींना विश्वासात घेणे आवश्यक आहे .
या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. तसेच कारवाई न करणाऱ्या उपकेंद्र संचालकांवर योग्य पद्धतीने कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अभाविपने केली आहे. पत्रकार परिषद घेत अभाविप प्रदेशमंत्री संकल्प फळदेसाई यांनी ही मागणी केली आहे. तर अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे असे मत ठाणे महानगर मंत्री योगेश दामले यांनी व्यक्त केले आहे.