Thane News | ठाण्यात मास्टिकसाठी यंत्रणांची धावपळ

ठाण्यात मास्टिकसाठी यंत्रणांची धावपळ; खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकला मागणी
thane road
खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकचा वापर करण्यात येत आहे. pudhari news network

ठाणे : खड्डे बुजवण्यासाठी वरदान ठरलेल्या मास्टिकसाठी सध्या सरकारी यंत्रणांना धावपळ करावी लागत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. (Mastic technology)

विविध प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून आपल्या परिक्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी इतर प्राधिकारणांकडूनही मास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होत होत आहे. परिणामी खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकची मागणी वाढली असल्याने मास्टिक मिळवण्यासाठी सध्या सरकारी यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

काय आहे मास्टिक तंत्रज्ञान ?

डांबरीकरणात मास्टिक (Mastic technology) हे अद्ययावत तंत्रज्ञान आहे. डांबराचे तापमान १८० ते २०० डिग्रीपर्यंत असते. त्याचा सेट होण्याचा कालावधी अतिशय कमी आहे. तसेच, ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक वापरले तेथे चांगला परिणाम दिसला आहे.

पावसाळा सुरु झाला आणि रस्त्यांवर पडण्यास सुरवात झाली आहे. असे असले तरी दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत येत आणलेल्या रस्त्यांवर खड्डे नसल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र घोडबंदर, घोडबंदरवरील उड्डाणपूल, मुंबई नाशिक हायवे, आशा एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नॅशनल हायवे यांच्या अखत्यारीत येत असलेल्या खड्ड्यांमुळे या यंत्रणांना टीकेचे धनी व्हावे लागते आहे. याशिवाय खड्ड्यांमुळे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत तो भाग वेगळा. एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. घोडबंदर मार्ग तर खड्यातच गेल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कॅडबरी, नितीन, वाघबीळ आदी उड्डाणपुलांसह, मुंबई नाशिक मार्गावर देखील खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स, पेव्हर ब्लॉक पेक्षाही मास्टीक हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडी, एमएसआरडीसी असेल या सर्वच प्राधिकणांनी मास्टीकचा वापर करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे रस्त्यांची उंची वर खाली होत असली तरी देखील हा पर्याय योग्य ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मास्टीक उपलब्ध होणे कठीण होत असल्याची माहिती पुढे आली आहे. घोडबंदर मार्गावरच मास्टीकचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. मास्टिकचा पुरवठा करणारे पुरवठादार यांची संख्या फार कमी असल्याने मास्टिक वेळेवर उपलब्ध होत नसल्याने यंत्रणांची चांगलीच धावपळ होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news