

सापाड (ठाणे) : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्राला लाभलेल्या विस्तृत खाडीकिनाऱ्यावरून जाणाऱ्या कल्याण रिंगरूटच्या चौथ्या टप्प्यातील कामात परिसरातील बहुतेक गावे बाधित होत असून गावांच्या मुख्य रस्त्याला छेद देऊन जाणाऱ्या रिंगरूट मार्ग स्थानिकांच्या मुळावर उठणार आहे. परिणामी रिंगरुटच्या मार्गात उड्डाणपुलाभावी क्रॉसिंग धोकादायक ठरणार असल्याने पालिका प्रशासनाच्या जोर-जबरदस्तीने उभारण्यात आलेल्या रिंगरोड मार्गाला ग्रामस्थांचा नाराजगी उफाळून आल्यामुळे रिंग रूट मार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
कल्याण रिंगरूट मार्गात अनेक गावातील मुख्य रस्त्याला छेदून जाणाऱ्या बाह्यवळण मार्गावर स्थानिक ग्रामस्थांकडून केलेली उड्डाणपुलाची मागणीला पालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखवत ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसून रिंगरूटच्या कामाला गती देण्याचे काम महापालिकेकडून केले जात आहे. त्यामुळे हुकूमशाही कार्यपद्धती बाबद पीडित ग्रामस्थांमधून नाराजगी व्यक्त होतांना दिसत आहे. हे नाराजगी दूर करण्यासाठी पालिका प्रशासन कोणतेही ठोस पावले उचलत नसून जोर जबरदस्तीने रिंग रोडच्या कामाला गती पाण्याचे काम करत आहे. परिणामी पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. कल्याण रिंगरूटच्या मार्गासाठी आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र आठ वर्षात या रिंगरूट मार्गासाठी तब्बल बाराशे कोटीचा खर्चाची निविदा
मंजूर करण्यात आली आहे. महापालिकेसाठी महत्वकांक्षी असणाऱ्या रिंगरूट मार्गाचे निधी अभावी सात टप्प्यात विभाजन करून चौथ्या टप्प्यातील (दुर्गाडी चौक ते गांधारी ब्रिज चौक) काम युद्धपातळीवर सुरू आहे. तांत्रिक अडचणी वगळून हा चौथ्या टप्प्यातील मार्ग पूर्ण करण्यात येणार असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले. मात्र या चौथ्या टप्प्यातील मार्ग दुर्गाडी चौक ते वाडेघर गाव, सापाड गाव, रौनकसिटी, उंबर्डे गाव, कोळीवली गाव ते गांधारी पुलावरून जाणाऱ्या कल्याण-पडघा महामार्गाला छेद देऊन जात असल्यामुळे येणाऱ्या काळात कल्याण रिंगरूट रस्ता वाहतुकीसाठी सुरू झाल्यावर रस्ता ओलांडताना मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवण्यात आली आहे.
मुंबई-ठाणे-नाशिक-पनवेल-पुणे-कर्जत-कसारा सारख्या महत्वाच्या शहरांना जोडणारा केंद्रबिंदू म्हणून कल्याण शहराकडे पाहिले जाते. तर पूर्व-पश्चिम मध्य रेल्वे लोहमार्गाच्या स्थानकांना जोडणाऱ्या कल्याण स्टेशनला जंक्शनचा दर्जा मिळाल्याने कल्याण स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस कमालीची वाढ होतांना दिसत आहे. कल्याण शहराची वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रशासन अपयशी ठरल्याने वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष उपाययोजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
उड्डाणपुलाला डावलून रिंगरूट मार्ग तयार केला तर ग्रामस्थांमध्ये आक्रोश उफाळून येईल. महापालिकेच्या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध नाही. मात्र महापालिकेत प्रकल्प उभारत असताना ग्रामस्थांच्या सुर-क्षेच्या प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे आहे. रिंग रोड मार्गेसर ग्रामस्थांच्या मुलावर उठत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. उड्डाणपुलाच्या मागणीसाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन केले जातील. तरीही प्रशासनाला जाग आली नाही तर आंदोलन उग्र रूप धारण करेल - नरेश पाटील, ग्रामस्थ सापाडगाव