

ठाणे : अभिनेते आणि नाट्यपरिषद ठाणे शाखेचे सक्रिय कार्यकर्ते राजू पटवर्धन यांचे मंगळवारी (दि. 31) अल्पशा आजाराने निधन झाले ते 65 वर्षांचे होते. गेली काही वर्षे ते डोंबिवली येथील भरारी विकलांग संस्थेत रहात होते.
अलीकडेच त्यांना डोंबिवली इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच बुधवार (दि.1 जानेवारी) आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. एक अभिनेता म्हणून संगीत रंगभूमी, व्यावसायिक मराठी रंगभूमी, राज्य नाट्य स्पर्धा तसेच अनेक दूरदर्शन मालिकांतून त्यांनी विविध भूमिका केल्या. थ्री इडियटस, व्हेंटीलेटर या चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. नाट्य परिषद, ठाणे शाखेच्या नाटकातून त्यांनी भूमिका केल्या, पं. राम मराठे संगीत महोत्सवात त्यांनी अनेक वर्ष दिग्गज कलावंतांना तानपुर्याची साथ त्यांनी केली.