

सापाड : योगेश गोडे
स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्पातील कल्याण स्टेशन परिसराचा कायापालट होत असून याचाच भाग असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बस आगाराच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. मात्र एस.टी. महामंडळाकडून जागेचा ताबा देण्यास उशीर केल्यामुळे विकासकामे लांबणीवर पडली होती. मात्र आता संपूर्ण जागेचे भूसंपादन झाले असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बस आगाराच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येणार्या काळात कल्याण स्टेशन परिसर हायटेक होण्याच्या मार्गावर आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 25 जानेवारी 2021 रोजी झाले होते. या कामात सरासरी 498 कोटी रुपये खर्च होणार आहे. कल्याण एसटी डेपो 1972 मध्ये सुरू झाला. सध्या 47 वर्षांनंतर आगाराच्या ताफ्यात 70 हून अधिक बस सेवा देत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत एसटी डेपोच्या जागेत अद्यावत व्यापारी संकुल, बस डेपो, पार्किंग प्लाझा होणार असल्याचे स्मार्ट सिटी आराखड्यात देण्यात आले आहे. स्मार्टसिटी योजनेतून विविध विकास करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून यासाठी कल्याण आणि डोंबिवली स्टेशन परिसराला प्रथम प्राधान्य दिले गेले आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, खाडी किनारा विकास, सिटी पार्क माध्यमातून पर्यटन स्थळ, रिंगरूट रेल्वे स्थानक परिसर विकासाचे प्रकल्प प्रशासनाने हाती घेतले आहेत. तसेच मेट्रो, रिंगरूट असे अनेक प्रकल्प भविष्यात साकारण्यात येणार आहेत. तर आयटी पार्क, स्टेशन परिसरातील बहुमजली पार्किंग स्मार्ट सिटी अंतर्गत नागरिकांच्या सेवेत आली आहेत. या आराखडा अंतर्गत स्टेशन परिसरात उड्डाणपुलाचे बीम टाकण्यात आले असून गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कल्याण स्टेशन परिसरात प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारी यंत्रणा दिवसरात्र कार्यरत आहेत. तर कल्याण बस आगाराचे एकूण क्षेत्रफळ 17 हजार 719 चौ.मी आहे. यामध्ये बसस्थानक आस्थापना, प्रवासी प्रतीक्षालय, स्वच्छता गृहे, कार्यशाळा, व्यवसायिक क्षेत्र, 18 बस फलाट, दुचाकी वाहनतळ, बस वाहनतळ, परिवहन महामंडळाच्या बसेससाठी अप्रोच रोड, एकूण 81 बसेस नाईट पार्किंगची सुविधा आदींचा समावेश आहे.
स्टेशन समोर बैलबाजार चौक ते नेताजी सुभाषचंद्र बॉस चौक सुमारे 1100 मीटर लांबीचा उड्डाणपूलाचे काम सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस एस.टी. डेपोमध्ये जाणे-येणेसाठी स्वतंत्र मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बॉस चौक मार्गे बैलबाजार दिशेने येणारी वाहतूक एस.टी. डेपो समोरुन भानू-सागर थिएटर मार्गे बैलबाजार स्मशानभूमी येथे कल्याण-शीळ रोडपर्यंत एकदिशा प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कल्याण बस आगाराच्या नूतनीकरण करणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जुन्या बस आगारामधील प्रवाशांसाठी असलेली बैठक व्यवस्था, स्वच्छता गृहे, उपहारगृह, पार्किंग सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे झाले असल्याने स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण बस स्थानक नव्याने उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत स्टेशन परिसरातील कामे युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहेत. मात्र काही भूसंपादनाभवी विकासकामे करण्यास उशीर झाला असला तरी आता एस.टी. महामंडळाकडून एक वर्षापूर्वी डेपोच्या जागेचा ताबा देण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बस आगाराच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. यात यु टाईप रस्ता आणि दोन इमारतींचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येणार्या काळात कल्याण स्टेशन परिसर हायटेक होण्याच्या मार्गावर आहे.
संदीप तांबे, अभियंता, स्मार्ट सिटी अधिकारी, ठाणे