

ठाणे : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, नियमित गाड्यांव्यतिरिक्त आतापर्यंत 1204 उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये 290 अनारक्षित गाड्या तसेच 42 वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे आणि आता प्रवाशांच्या हितासाठी 6 अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांच्या सेवा चालवल्या जातील.
या विशेष गाड्यांमध्ये भिवंडी - सांकराईल अनारक्षित साप्ताहिक विशेष - 3 सेवा, 01149 अनारक्षित विशेष गाड्या 9 एप्रिल ते 23 एप्रिलपर्यंत दर बुधवारी भिवंडी येथून 22:30 वाजता सुटेल आणि सांकराईल माल टर्मिनल यार्ड येथे तिसर्या दिवशी दुपारी 1:00 वाजता पोहोचेल.
दरम्यान या गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपुर, बिलासपुर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपुर, टाटानगर आणि खड़गपूर येथे थांबे देण्यात आले आहेत.
खडगपूर-ठाणे अनारक्षित साप्ताहिक विशेष 3 सेवेमध्ये 01150 अनारक्षित विशेष दिनांक 12 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत दर शनिवारी खड़गपुर येथून 23.45 वाजता सुटेल आणि ठाणे येथे तिसर्या दिवशी 10.30 वाजता पोहोचतील. या गाड्यांना टाटानगर, चक्रधरपूर, राउरकेला, झारसुगुड़ा, बिलासपुर, रायपुर, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण येथे थांबे देण्यात आले आहेत. या अनारक्षित विशेष गाड्या आणि कोचसाठी तिकिटे सामान्य शुल्कात यूटीएसद्वारे बुक करता येतील.