Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; १५४५ किलोमीटर प्रवास करून पोलिसांनी पपलू आणि टल्लीला उचलले

दहा दिवसांपासून होते फरार; प्रयागराजमधून दोघांना अटक, हत्येच्या कटाचा उलगडा होण्याची शक्यता
Pradeep Purnekar case
Pradeep Purnekar casePudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील आणखी दोन प्रमुख आरोपींना गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली आहे. संतोष ऊर्फ टल्ली आणि अमित सिंग ऊर्फ पपलू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही गेल्या दहा दिवसांपासून फरार होते. सुमारे १,५४५ किलोमीटरचा प्रवास करून पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या.

प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाली, त्या दिवशी संतोष टल्लीसोबत हेल्मेट घालून आलेला अनोळखी आरोपी कोण, हा प्रश्न पोलिसांसमोर होता. तपासादरम्यान या आरोपीची ओळख पटली असून, तो अमित सिंग ऊर्फ पपलू असल्याचे निष्पन्न झाले आहे. पपलू हा मीरा-भाईंदर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट संतोष टल्ली आणि पप्या शिंदे यांनी मिळून रचल्याचा संशय आहे. हत्येसाठी लागणारी घातक हत्यारे आणि वाहनाची व्यवस्था या दोघांनी केल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील कटकारस्थानाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. सुरुवातीला त्यांनी रायगड जिल्ह्याच्या दिशेने प्रवास केला आणि त्यानंतर उत्तर प्रदेशातील प्रयागराज गाठले. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा माग काढला. अखेर प्रयागराज येथून संतोष टल्ली आणि अमित सिंग ऊर्फ पपलू यांना अटक करण्यात आली. या दोघांच्या अटकेमुळे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील कट, त्यामागील कारणे आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका स्पष्ट होण्यास मदत होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news