अक्षय शिंदेचा एका गोळीत केला गेम, पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

Badlapur accused encounter | चार बुलेट शेल सापडले
Badlapur accused encounter
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी मृत अक्षय शिंदे. (File photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील (Badlapur accused encounter) आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवारी एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. दरम्यान, अक्षयच्या वडिलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर आज बुधवारी तातडीने सुनावणी होणार आहे. त्यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) मागणी केली आहे. त्यांचा मुलगा 'फेक एन्काऊंटर'मध्ये मारला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अक्षयच्या डोक्याच्या डाव्या बाजूला एकच गोळी लागली

दरम्यान, द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २४ वर्षीय अक्षयच्या डोक्याच्या डाव्या बाजूला एकच गोळीची खूण आढळून आली असून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. पोलीस एस्कॉर्टिंग पथकाच्या खात्याच्या आधारे, मुंब्रा पोलिसांनी दोन गुन्हे नोंद केले आहेत. त्यात एक अपघाती मृत्यू आणि दुसरा खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्याचा समावेश आहे. या प्रकरणी आता सीआयडीने चौकशी सुरु केली आहे.

मुंब्रा बायपासजवळ घटनास्थळाची पाहणी, चार बुलेट शेल सापडले

फॉरेन्सिक पथकांनी पीसीआर व्हॅनची तपासणी केली. तसेच त्यांनी जिथे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला; त्या मुंब्रा बायपासजवळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तेथील रक्ताचे नमुने गोळा केले आहेत. तेथून चार बुलेट शेल ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत, मृत अक्षयच्या वडिलांच्या वकिलाने पुरावे नष्ट केले जाऊ शकतात असे सांगून तातडीने सुनावणीची मागणी केली आहे.

Akshay Shinde Encounter : एन्काऊंटर कसे घडले?

या एन्काऊंटरदरम्यान एकूण चार गोळीबार करण्यात आलेले होते. त्यातील तीन राउंड हे आरोपी अक्षय शिंदे याने झाडले. तर एक राउंड स्वसंरक्षणार्थ एसआयटी पथकातील संजय शिंदे यांनी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडली. यात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. एवढे मोठे एन्काऊंटर नाट्य मुंब्रा बायपासवर घडले. पण गोळीबाराचा आवाजही आसपासच्या लोकांना आला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

Badlapur accused encounter
Akshay Shinde : एकाच गोळीत अक्षय शिंदे खल्लास !

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news