

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात फलाटांवर लोखंडी खांब, लोखंडी बाकडे पुनर्व्यवस्थापनासाठी हटवून दुसऱ्या जागी बसवण्यात आले आहेत. मात्र ते अर्धवटरित्या काम केल्यामुळे लोखंडी तुकडे, पत्रे प्रवाशांना लागून इजा होण्याचा संभाव्य धोका आहे. यासंबधी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करून देखील याची दखल न घेतल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
ठाणे रेल्वे स्थानकावर लोखंडी खांब, बसण्यासाठी लोखंडी बाकडे हटवण्याचे काम कंत्राटदारांना देण्यात आले आहे. मात्र हे लोखंडी खांब, बाखडे अर्धवट कापल्यामुळे, अर्धे राहिलेले लोखंडी तुकडे ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर जागोजागी दिसून येत आहे. मात्र व बऱ्याच वेळेला हे लोखंडी तुकडे दुर्लक्षीत होऊन काही प्रवाश्यांच्या पायाला लागतात व ह्या तुकड्यांना पाय लागून पडल्याचेही अनेक प्रकार समोर आले आहे. अशा प्रकारे प्रवाश्यांना मोठी इजा होऊ शकते. या उद्देशाने प्रवाशांनी लोखंडी तुकडे काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली परंतु कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे प्रशासन काम पूर्ण करण्यासाठी काही कंत्राटदार निवडतात व त्या कंत्राटदारांच्या कामाकडे लक्ष्य देता न आल्यामुळे कंत्राटदार अर्धवट काम करतात तर भरपूर वेळेला बाखडे, प्लाटावरील पॉल आणि लोखंडी शिगा कंत्राटदारांकडून अर्धवट पणे कापण्यात येतात. हे अर्धवट कापलेले लोखंडी तुकडे प्रवाश्यांच्या पायाला लागतात. आणि मोठ्या प्रमाणात दुखापत होते व हा अपघात टाळण्यासाठी काही प्रवाश्यानी ठाणे रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडे ते लोखंडी तुकडे पूर्णतः काढण्यासाठी विनंती केली होती. त्या वेळी रेल्वे प्रशासनाने २ दिवसात लोखंडी तुकडे काढून टाकू असे प्रवाश्याना आश्वासन दिले. परंतु महिना पालटून हे अर्धवट कापलेले तुकडे हटवले नव्हते. म्हणून संतप्त प्रवाश्यांनी रेल्वे प्रशासन प्रवाश्यांच्या विषयांना गांभीर्याने घेत नाही असा आरोप करत याकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची मागणी केली आहे.