Thane | ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत पॅराग्लायडर, ड्रोनला मनाई

अधिसूचना : पॅराग्लायडर, ड्रोनला उद्यापासून 60 दिवसांची बंदी
ड्रोन
ड्रोनfile photo

ठाणे : सुरक्षेच्या दृष्टीने अतिरेकी, दहशतवादी आणि असामाजिक प्रवृत्यांपासून धोका निर्माण झाल्याने ठाणे विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांनी शासनाच्या अधिसूचनेनुसार ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय रिमोटद्वारे ड्रोन, मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडसारख्या वस्तूंच्या वापरास मंगळवारी (दि.9) मनाई आदेश देण्यात आले आहेत. या मनाई आदेशानुसार उद्यापासून 12 जुलै ते 9 सप्टेंबरपर्यंत 60 दिवसांची बंदी करण्यात आली आहे.

देशातील विविध ठिकाणी अतिरेकी, दहशतवादी यांनी रिमोटद्वारे नियंत्रित होणार्‍या ड्रोन अथवा हवाई क्षेपणास्त्राद्वारे हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा अंदाज घेता प्राप्त परिस्थितीमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात अतिरेकी, दहशतवादी असामाजिक घटक हे पॅराग्लायडर, रिमोटद्वारे कंट्रोल होणार्‍या ड्रोन अथवा मायक्रो लाईट एअरक्राफ्टचा वापर करून हल्ला करू शकतात, अशा कारवायांवर आळा घालणे आवश्यक आहे.

अन्यथा होणार शिक्षा...

दरम्यान, असे प्रकार रोखण्यासाठी तातडीने अशा हवाई प्रकारांचा वापर करण्यास मनाई आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयाचे विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांनी जारी केलेले आहेत. ठाणे पोलिसांच्या मनाई आदेशामुळे आता आयुक्तालयाच्या हद्दीत पॅराग्लायडर, ड्रोन, मायक्रो लाईट एअरक्राफ्टचा वापर करून मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास ते शिक्षेस प्राप्त राहणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news