

ठाणे : पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या वेळी जम्मू काश्मीरमध्ये ठाणे जिल्ह्यातील 40 पर्यटक तेथे होते. या हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणार्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाला असून इतर 37 पर्यटक सुरक्षित आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर येथे सुरक्षित असलेले ठाणे जिल्ह्यातील अनुष्का मोने (35), ऋचा मोने (18), मोनिका जोशी (45), ध्रुव जोशी (16), कविता लेले (46), हर्षल लेले (20), भूषण अशोक गोळे (39), ज्योती अशोक गोळे (36), आरव भूषण गोळे (8), विनोद विश्वास गोळे (41), माधुरी विनोद गोळे (41), विहान विनोद गोळे (11), स्वाती विश्वास गोळे (36), अतुल प्रकाश सोनवणे (42), प्रियंका अतुल सोनवणे (34), अनन्या अतुल सोनवणे (12), अर्णव अतुल सोनवणे (8), नंदकुमार म्हात्रे (65), निलिमा म्हात्रे (65), निशांक म्हात्रे (31), प्रमदा पाटील (30), सुजन पाटील (63), आशा पाटील (60), नेहा ठाकूर (35), मनोज ठाकूर (39), विहान ठाकुर (07), संजय म्हात्रे (58), स्वाती म्हात्रे (49), नेत्रा भूषण पांगेरकर (37), भूषण इंद्रनाथ पांगेरकर (40), इंद्रायणी इंद्रनाथ पांगेरकर (65), श्लोक भूषण पांगेरकर (12), विहान देवेन ढोलम (05), गौरव सांगळे (37), दीपाली सांगळे (35), स्वाती सांगळे (40), वेद सांगळे (07), शुभ क्षीरसागर (10), मनाली प्रणय ठाकूर (28), प्रणय ठाकूर (29) हे पर्यटक आहेत
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तत्काळ 9372338827 / 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.
श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी 247 मदत कक्ष सुरू करण्यात आला.
दूरध्वनी क्रमांक : 0194-2483651, 0194-2457543,
व्हॉटस्अॅप क्रमांक : 7780805144, 7780938397
अशी माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाने दिली आहे.