

नाते : इलियास ढोकले
हिंदवी स्वराज्य निर्मितीचे प्रेरणा स्तोत्र असलेल्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा पाचाड येथील राजवाडा संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत विभागाकडून रायगड प्राधिकरणाकडे देण्यात यावा अशी मागणी प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी केली आहे.
किल्ले रायगड व परिसरात सुरू असलेल्या रायगड प्राधिकरणाच्या विकासात्मक कामांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने त्यांनी दोन दिवसीय दुर्गराज रायगड दौरा केला. पावसाळ्यानंतर गडावर विविध कामे सुरू करण्यात आलेली आहेत. या कामांस प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
या भेटीवेळी रायगड विकास प्राधिकरणचे तज्ञ, अधिकारी व विशेष स्थापत्य पथकाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. पावसाळ्यानंतरील पहिल्या टप्प्यात गडावरील श्रीगोंदा तलावाची दुरुस्ती व संवर्धन, फुटका तलाव क्र. २ ची दुरुस्ती व संवर्धन, पायरीमार्गावरील खुबलढा बुरुजाचे जतन व संवर्धन, महादरवाजा जवळील तटबंदीचे संवर्धन अशी संवर्धनात्मक कामे सुरू झालेली आहेत.