कुख्यात लुटारू जाफर इराणीचा चेन्नईत पोलिस चकमकीत खात्मा

कल्याण जवळच्या इराणी काबिल्यात सन्नाटा
Jafer Irani |
कुख्यात लुटारू जाफर इराणी.File Photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या इराणी काबिल्यातील जाफर गुलाम इराणी (२७) हा आंतरराज्यीय पोलिस रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार चेन्नईमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. हे वृत्त समजताच इराणी काबिल्यात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी चक्क विमान प्रवास करणारा हा बदमाश चेन्नई पोलिसांच्या गोळीने शिकार झाला. त्याच्याकडे थोडे ना थोडके १० किलो सोने सापडल्याचे वृत्त आहे.

आंबिवली स्टेशनजवळच्या पाटील नगर नावाने ओळखला जाणारा इराणी काबिला चोर, लुटारू, दरोडेखोर गुन्हेगारांमुळे पुरता बदनाम झाला आहे. याच काबिल्यात चोरी-छुपे राहणाऱ्या जाफर इराण्याचा अंत चेन्नई पोलिसांच्या हातून झाला आहे. जाफरच्या मृत्यूमुळे काबिल्याशी संबंधित अन्य बदमाश भूमिगत झाले आहेत.

विमानाने परराज्यात जाऊन दरोडे, चोऱ्या, घरफोड्या, धूम स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा सरदार तथा म्होरक्या जाफर इराणी असल्याची माहिती चेन्नई पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी चेन्नईमध्ये पोलिसांनी आत्मरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात एकाचा मुडदा पडला. चेन्नईमधून तब्बल दहा किलो सोन्याची चोरी करून पसार होण्याच्या तयारीत असतानाच तेथील पोलिसांच्या गोळीने जाफर गुलाम इराणी याचा वेध घेतला. हा बदमाश जागीच ठार झाला. तर सलमान मेश्राम आणि अमजद इराणी हे दोघे जखमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news