Neck Pain and Stroke Risk: मानेचे दुखणे, आखडणे दुर्लक्षित करू नका; स्ट्रोकचा धोकाअशास्त्रीय उपचार जीवावर बेतण्याची शक्यता

तरुणांमध्येही स्ट्रोकचे प्रमाण वाढतेय – डॉ. ऋषभ छेडा यांचा इशारा
Neck Pain and Stroke Risk
Neck Pain and Stroke RiskPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: मान आखडणे, कंबर दुखणे अशा प्रकारच्या दुखण्यावर अशास्त्रीय रित्या वैद्यांकडून उपचार करणे जीवावर बेतू शकते. अशा घटना अलीकडे १० टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. अशा दुखण्याकडे दु दुर्लक्ष केले तर ती जीवावर बेतते.

त्यासाठी योग्य वेळ योग्य वैद्यकीय उपचार आवश्यक असल्याचे या विषयाचे तज्ज्ञ, कल्याण येथील फोर्टीस हॉस्पीटलचे न्यूरो, स्पाईन आणि स्ट्रोक इन्ट्रोव्हेनशन तज्ञ डॉ. ऋषभ छेडा यांनी व्यक्त केले. स्ट्रोक दिनानिमित्त त्यांनी स्ट्रोक विषयावर विश्लेषण करतांना ते बोलत होते.

Neck Pain and Stroke Risk
Leopard Attack: डहाणूत बिबट्याच्या हल्ल्यात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू; माटगावमध्ये घटना

स्ट्रोकचा धोका केवळ वृद्धांनाच असतो असे नाही तरुण आणि वरकरणी निरोगी दिसणाऱ्या व्यक्तींनाही स्ट्रोक येऊ शकतो. मानेचे दुखणे किंवा आखडणे याकडे दुर्लक्ष करू नये. तसेच अशा त्रासावर कोणत्याही अपात्र व्यक्तीकडून जोर लावून मान वळवून घेणे किंवा उपचार करून घेणे टाळावे.

मानेच्या त्रासाचे नेमके कारण समजून घेण्यासाठी आणि योग्य उपचार मिळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे असे मत कल्याण येथील फोर्टीस हॉस्पीटलचे न्यूरो, स्पाईन आणि स्ट्रोक इन्ट्रोव्हेनशन तज्ञ डॉ. ऋषभ छेडा यांनी व्यक्त केले.

Neck Pain and Stroke Risk
Palghar Conservation Reserve: पालघरमधील जव्हार-अशेरीगड-धामणीला संवर्धन राखीव दर्जा; महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची मान्यता

कामाचे बैठे स्वरूप, सतत स्क्रीनसमोर बसून काम करणे, ही अनेकांची जीवनशैली झाली आहे. थोडावेळ जागेवरून उठून पायी चालणे, वैगरे होत नाही, अनेकांचे व्यवसायच अशा स्वरूपाचे असतात. त्यात त्याच स्थितीत बसून काम करावे लागतात, त्यामुळे ताण निर्माण होतात.

पहिले माणसे जड वस्तू, थोडे पायी चालणे अशा कुठल्या ना कुठल्या रूपात हालचाल करत असत, आजकाल अशा हालचाली मंदावल्याने कमरेत, मानेत दुखणे असे प्रकार घडत आले. स्ट्रोकचा आजार हा केवळ वयस्कर किंवा ज्येष्ठापर्यंत उरला नाही, तर तरूण पिढीपर्यंत या आजाराचे लोण पोहचले आहे, या स्ट्रोकमुळे मृत्यूही ओढावत आहेत, याकडे डॉ. छेडा यांनी लक्ष वेधले.

स्ट्रोकचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेह आणि बैठी जीवनशैली या तीन गोष्टी प्रमुख कारण आहेतच. परंतू मद्यपान, धुम्रपानासारख्या गोष्टीमुळे स्ट्रोक येण्यास कारणीभूत आहेत.

तरूणाई जर या प्रकारची व्यसने करत असतील तर ते लवकर स्ट्रोकला बळी पडतात. अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेह असेल तर स्ट्रोक आलेल्या रूग्णाचा मृत्यू ओढावू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.