Naropant Nilkanth samadhi : छत्रपती शिवरायांचे अमात्य नारोपंत नीलकंठ यांची समाधी कुणकेश्वरात

कोकण इतिहास पत्रिकेच्या शोध निबंधातून पुढे आले नवे सत्य
Naropant Nilkanth samadhi
अमात्य नारोपंत नीलकंठ यांची समाधी pudhari photo
Published on
Updated on

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील महत्त्वाचे पद भूषवणारे अमात्य नारोपंत नीलकंठ यांच्या कुणकेश्वर येथील समाधी वृंदावनाचा ऐतिहासिक उलगडा झाला आहे.या विषयीचा अभ्यास कोकण इतिहास पत्रिकेमध्ये 7 फेब्रुवारी रोजी संत गोन्सालो गार्सिया कला व वाणिज्य महाविद्यालय, वसई येथे प्रकाशित करण्यात आला आहे.

इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर आणि संदीप परब यांनी संयुक्तपणे केलेल्या या शोध निबंधात उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रे, समकालीन पत्रव्यवहार, महसुली नोंदी तसेच स्थानिक परंपरांचा चिकित्सक अभ्यास करून नारोपंत अमात्य यांच्या समाधी वृंदावनाचे ऐतिहासिक अस्तित्व आणि कुणकेश्वर देवालयाशी असलेले संबंध स्पष्ट केले आहेत.

या शोधनिबंधासाठी इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर आणि संदीप परब यांनी केवळ मौखिक परंपरांवर अवलंबून न राहता, भक्कम ऐतिहासिक पुराव्यांची मांडणी केली आहे. यामध्ये ऐतिहासिक कागदपत्रे, उपलब्ध पत्राचार आणि समकालीन दप्तरांचा चिकित्सक अभ्यास सादर केला आहे.

Naropant Nilkanth samadhi
Thane News : ठाणे जिल्ह्याच्या विकास आराखड्याचा उडाला बोजवारा

1874 मधील वृंदावन नोंदी, 195455 च्या 7/12 उताऱ्यांतील माहिती आणि सर्व्हे नकाशांच्या आधारे नारोपंत अमात्य यांची समाधी श्री कुणकेश्वर मंदिरालगत असल्याचे तसेच त्या परिसराशी त्यांच्या वंशजांचा दीर्घकालीन संबंध असल्याचे शोध निबंधातून अधोरेखित होते.

अधिक माहितीसाठी रणजित हिर्लेकर-9423303670, तसेच संदीप परब : 993066355 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निष्कर्षांमुळे कोकणातील मराठा इतिहासाच्या अभ्यासाला नवे परिमाण प्राप्त झाले आहे. हा अभ्यास इतिहासप्रेमी, संशोधक आणि वाचकांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भ ठरणार असून कोकणच्या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठीही तो उपयुक्त ठरणार आहे.

Naropant Nilkanth samadhi
Micro art Shivaji Maharaj : अवघ्या एक सेंटीमीटरच्या कवडीवर साकारली शिवरायांची प्रतिमा

अभ्यासकांसाठी ठरणार महत्त्वपूर्ण

विशेष म्हणजे या परिसराशी आणि कुणकेश्वर देवालयाशी अमात्यांच्या वंशजांचा असलेला दीर्घकालीन संबंध या संशोधनातून अधोरेखित झाला आहे. हा शोधनिबंध इतिहासप्रेमी, संशोधक आणि अभ्यासकांसाठी एक महत्त्वपूर्ण संदर्भ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कोकणच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news