अंबरनाथ : शहराच्या पूर्व भागातील पालेगाव परिसरात राहणारे विकी लोंढे (२७) यांनी अज्ञात कारणाने आपली पत्नी रुपाली लोंढे (२६) हिचा चाकूने गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपी पती विकी लोंढे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विकी लोंढेचे रुपाली सोबत चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र कोणत्या न कोणत्या कारणाने या दोघांचे नेहमीच खटके उडायचे. असेच भांडण या दोघांमध्ये आठ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाले व त्यातूनच विकी याने घरातील चाकूने आपल्या पत्नीचा गळ्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली.
हत्या केल्यानंतर विकी हा फरार झाला असून विकीची बहीण दीपाली यांच्या फिर्यादीनुसार येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.