

मुरबाड : सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक योगेंद्र बांगर यांच्या संकल्पना व प्रयत्नांतून मुरबाड तालुक्यातील फांगणे गावी सुरू असलेल्या कै. मोतीराम गणपत दलाल ट्रस्ट संचलित जगातील पहिल्या आजीबाई शाळेला आजवर अनेक देशांच्या वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी भेटी देऊन प्रसिद्धी दिली. मात्र आता या आजीबाईंच्या शाळेची जपानने दखल घेतली आहे. ही शाळा लवकरच जपानी भाषेतून नव्याने प्रसिद्धीला येणार आहे. (students of Aajibainchi Shala in Phangane a village 95 km from Mumbai, grandmothers are strapping on bags and skipping spiritual 'baithaks' for school time)
कल्याण-अहमदनगर महामार्गावर मुंबईपासून 95 किमी अंतरावर असलेल्या नॉनडिस्क्रिप्ट नॉन-मोटर करण्यायोग्य फांगणे गाव आता प्रसिद्ध होत आहे. 400 लोकसंख्येचे असलेल्या या गावात लालपरी (राज्य परिवहन महामंडळाची बस) णि सरकारचे बीडीओ (ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर) फिरकतही नव्हते. तेथे 8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनी या गावाची परिस्थिती बदलली दिसून येत आहे. येथील आजीबाई पिशव्या भरत आहेत पण त्या मंदिरात जाऊन अध्यात्म करण्यासाठी नाही तर शाळेत जाण्यासाठी! शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नसते, हे येथील आजीबाईंच्या शिक्षणाच्या जिद्दीवरुन दिसून येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जपान देशातील एनएचके या विश्वविख्यात वृतसंस्थेचे प्रतिनिधी युएडा कोहेल तसेच दिल्ली येथील सुप्रसिद्ध पत्रकार व जपान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन न्यु दिल्ली ब्युरोचे अभिषेक धुलीया हे अथक परिश्रम घेऊन या आजीबाई शाळेचे वार्तांकन करत आहेत. (learning has no age limit)
शाळेसंदर्भातील माहिती सोबत गावातील निसर्ग, स्वच्छता, भारतीय संस्कृती, आजीबाई अशा विविध महत्त्वाच्या बाबींचा यावेळी त्यांनी निरीक्षण व अभ्यास केला. याप्रसंगी त्यांना भेट देण्यात आलेल्या आजींच्या कविता या पुस्तकाचे मुखपृष्ठ तसेच त्यातील कवितांचा भावानानुवाद देखील त्यांनी जाणून घेतला. त्यामुळे मुरबाडच्या आजीबाई शाळा आता लवकरच जपानी भाषेतून देखील जगभर गौरविली जाणार असल्याने मुरबाड तालुक्याच्या शिरपेचात आणखीन एक मनाचा तुरा रोवला जाणार आहे. तर या दोन्ही पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या शिक्षिका शितल प्रकाश मोरे यांनी तर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीपभाई दलाल यांनी आभार मानले.