

ठाणे : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू नोंद जखमी झाले आहेत. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असून दोषींवर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवार (दि.10) रोजी आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढला आहे.
रेल्वे स्थानकात मनसेचे झेंडे आणि घोषणाबाजीने स्थानक दणाणून सोडला आहे. प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली जात असून या मोर्चाचे नेतृत्व ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि शहर अध्यक्ष रवींद्र मोरे हे करीत आहेत. महिला कार्यकर्त्याही मोठ्याप्रमाणावर सहभागी झाल्या आहेत.