Accident News: मुंबई-वडोदरा महामार्गावर उद्घाटनापूर्वीच अपघात; दुचाकीस्वार ठार

शरद पाटील वय 52 रा. पारीवली असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
Accident News
Accident NewsPudhari
Published on
Updated on

भिवंडी: मुंबई-वडोदरा या द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन होणे शिल्लक असतानाच या महामार्गाचा वापर वाहन चालकांकडून केला जात असताना रात्रीच्या सुमारास वडपेकडे येणाऱ्या कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एकाच जागेवर मृत्यू झाला आहे. शरद पाटील वय 52 रा. पारीवली असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

भिवंडी तालुक्यात जेथे समृद्धी महामार्ग सुरू होतो त्याच पॉईंटवर वडपे येथे मुंबई जे एन पी टी वडोदरा या महामार्गाची सुरवात होत आहे. या मार्गाचा वापर अजून अधिकृत सुरू झाला नसला तरी या मार्गावर वडपे ते शिरसाठ फाटा येथ पर्यंत रस्त्याचा वापर वाहन चालकांकडून सुरू केला आहे.

Accident News
Central Railway Ticket: विनातिकीट प्रवाशांकडून 252 कोटींचा दंड वसूल

शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील पुंडास, खांडपे गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा महामार्गावर वडपे कडे भरधाव येणाऱ्या कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने दोन दुचाकी वाहनांना धडक दिली. यामध्ये शरद पाटील वय 52 रा. पारिवली या दुचाकीस्वाराचा

जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबई वडोदरा रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याच्या उद्घाटना पूर्वीच या रस्त्यावर अपघात घडल्याची घटना घडली असून घटनास्थळी गणेशपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस हजर झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news