Taxi - Rickshaw fare : ठाणे- मुंबईत रिक्षा- टॅक्सी एका रुपयांनी महागली! १ सप्टेंबरपासून दरवाढ लागू!

रिक्षाने रात्रीचा प्रवास ३४ रुपये तर टॅक्सी ४१ रुपये, रिक्षाला पहिल्या १.५ किलोमीटरसाठीचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये, तर टॅक्सीचे ३१ रुपयांवरून ३३ रुपये
AI image
AI image
Published on
Updated on

 ठाणे : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या बैठकीत रिक्षा भाडे १ रुपयांनी  तर टॅक्सी भाडे दोन रुपयांनी वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. ही भाडेवाढ १ सप्टेंबरपासून लागू झाली असून आता ऑटो रिक्षाला पहिल्या १.५ किलोमीटरसाठीचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये आणि टॅक्सीच्या पहिल्या १.५ किलोमीटरसाठीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये मोजावे लागणार आहेत.

रात्री बारा वाजल्यानंतर ३४ रुपये आणि  ४१ रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. या भाडेवाढ लागू करण्याची आज अधिसूचना काढण्यात आली आहे.   खटुआ समितीच्या शिफारशीनुसार ही भाडेवाढ करण्यात आलेली आहे. रिक्षा - टॅक्सी संघटनांनी चार रुपयांची भाडेवाढ मागितली होती.  मात्र परिवहन सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिक्षा एक रुपये आणि टॅक्सी भाडेवाढ  दोन रुपये करण्यास मंजुरी दिली.

AI image
Malad Protest: मैदान वाचवण्यासाठी मनसेचा मालाड पी-पश्चिम कार्यालयावर मोर्चा; पालिका आवारात क्रिकेट खेळून निषेध

टॅक्सीचे प्रतिकिलोमीटर भाडे २०.६६ रुपयांवरून २१.९० रुपये झाले. त्यानुसार पहिल्या १.५ किलोमीटरसाठी आकारण्यात येणारे किमान भाडे ३३ रुपये निश्चित करण्यात आले आहे. टॅक्सीला रात्री बारा वाजल्यानंतर ४१ रूपये मोजावे लागतील तर रिक्षाला  ३४ रुपये पहिल्या दीड किलोमीटरसाठी प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. 

रिक्षाला पहिल्या दीड किलोमीटरसाठी २७ रुपये झाले असून पुढील प्रति किलोमीटर दर १८.२२ रुपये असणार आहे. प्रतीक्षा शुल्क ८.७५ रुपये रिक्षा तर १० रुपये ३३ पैसे टॅक्सीला द्यावे लागतील.  ही भाडेवाढ मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोबिवली, वसई-विरार, पनवेल आणि पालघर या संपूर्ण एमएमआर परिसरात लागू असणार आहे. सीएनजीच्या दरात झालेली वाढ , वाहनांची देखभाल-दुरुस्ती, विमा आणि परवाना नूतनीकरणाचा वाढलेला खर्च लक्षात घेऊन खटुआ समितीच्या शिफारसीनुसार आणि सूत्रानुसार ही दरवाढ करण्यात आल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. 

  सुधारीत भाडेदरानुसार भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन करून घेणे बंधनकारक असून, जे परवानाधारक रिकॅलीब्रेशन करून घेतील, केवळ त्याच ऑटोरिक्षा व टॅक्सींना ही भाडेवाढ लागू होईल. भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे रोहित काटकर यांनी कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news