Mulund Car Accident: गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट भाजीच्या दुकानात; मुलासह महिलेचा मृत्यू

यामध्ये भाजी घेण्यासाठी आलेल्या एका महिलेसह एका दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करत 74 वर्षीय कार चालकाला अटक केली आहे.
Mulund Car Accident
Mulund Car AccidentPudhari
Published on
Updated on

कुर्ला: गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार भाजीच्या दुकानात घुसल्याची घटना गुरुवारी सायंकाळी मुलुंड पश्चिम येथे घडली आहे. यामध्ये भाजी घेण्यासाठी आलेल्या एका महिलेसह एका दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करत 74 वर्षीय कार चालकाला अटक केली आहे.

मुलुंडच्या सिमेंट रोडवरील निर्मल लाइफस्टाइल परिसरात गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला आहे. याच सोसायटीबाहेर एक भाजी विक्रीचे दुकान असून सायंकाळी याठिकाणी भाजी घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी असते.

Mulund Car Accident
Plastic Notes: 50, 100, 500 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार; आरबीआयचा पायलट प्रोजेक्ट लवकरच?

गुरुवारी सायंकाळी देखील दोन महिला याठिकाणी भाजी खरेदी करत असताना, या दुकानात अचानक भरधाव कार घुसली. यामध्ये भाजी घेण्यासाठी आलेल्या दोन महिला आणि त्यांच्याकडे असलेल्या दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. येथील स्थानिकांनी तत्काळ या तिघांना मुलुंडमधील अगरवाल रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारापूर्वीच यातील नियती शहा (44) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी सकाळी राधेश रैया या दोन वर्षांच्या लहान मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. तर त्याची आई देखील यामध्ये गंभीर जखमी असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी याच ठिकाणी आरोपी देखील उपस्थित होता. पोलिसांनी रात्री त्याच्यावर गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे.

Mulund Car Accident
Mumbai Climate Change: येत्या 14 वर्षांत किनारपट्टीवर मोठी उलथापालथ; अझीम प्रेमजी विद्यापीठाचा अहवाल

नियंत्रण सुटल्याने अपघात

या अपघातामधील आरोपी मोहन सेशाद्री (74 ) हे याच इमारतीमध्ये राहणारे असून ते त्यांची नवीन गाडी घेऊन इमारतीच्या बाहेर पडले होते. मात्र अचानक एका वाहन चालकाने त्यांना कट मारल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही गाडी या भाजीच्या दुकानात घुसली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news