MSRTC News | एसटीच्या ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक बस : भारत गोगावले

महामंडळ अध्यक्ष आ. भारत गोगावले यांची घोषणा; माणगाव येथे पुरस्कार वितरण
माणगाव, पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा
माणगाव येथे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ. भरत गोगावले pudhari news network
Published on
Updated on

माणगाव : राज्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज करणार असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये विविध सोयी सुविधाही प्रवाशांना पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार इलेक्ट्रिक बस आणि 2200 डिझल बस सामिल होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ. भरत गोगावले यांनी माणगाव येथे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना केली. बसस्थानकांची सुधारणा करत असून 110 कोटी रुपयांचे टेंडर या चार पाच दिवसात प्रसिद्ध होतील असेही ते म्हणाले.

माणगाव तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा कुणबी भवन माणगाव याठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ. भरत गोगावले यांच्याहस्ते तसेच शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अँड.राजीव साबळे यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या विशेष उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमास व्यासपीठावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर-काळे, माणगाव पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता बक्कम, पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख, उद्योजक विजयशेठ मेथा, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आ. भरत गोगावले म्हणाले कठी सार्वजनिक कार्यात माणगावकर नेहमीच पुढाकार घेऊन काम करतात हि कौतुकास्पद बाब आहे. माणगाव तालुका पत्रकार संघाने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करून कौतुकास्पद काम केले आहे.

राज्याच्या विकासात एसटी महामंडळाचा मोठा वाटा आहे.त्यामुळे आता एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील महत्वाच्या स्थानकांचा विकास करुन तेथे प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरविण्यावर आमचा भर राहणार आहे.भविष्यात एसटीचा कारभार आणखी गतिमान केला जाईल.

आ.भरत गोगावले, एसटी महामंडळ अध्यक्ष

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news