

ठाणे ः ठाण्याला येऊरचे मिळालेले वरदान माकडांच्या हैदोसाने आता शाप वाटू लागले आहे. ठाणे महानगरातील शिवाई नगर मधील गणेश नगर भागात माकडांचा भरदिवसा हैदोस असतो. घरात घूसून वस्तू उचलून माकडे फरार होत असल्याने या भागातील नागरिकांनी वानर व माकडांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला साकडे घातले आहे.
येऊर भागात संजय गांधी उद्यानाचा बराचसा भाग येतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात चौदा प्रकारचे प्राणी आढळतात.यामध्ये हरिण,बिबटे,सांबर,ससे, पट्टेदार तरस,कोल्हा अशा प्राण्यांबरोबर माकडांची संख्याही झपाट्याने वाढत असते. या माकड व वानरांना जंगलात खाद्य मिळत नसल्याने ती शहराकडे वळत असल्याचे दिासून येत आहे. मात्र त्यांच्या शहरातील प्रवेशामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.येथील इमारतींवर ही माकडे सरार्स आढळून येत आहे. खिडक्यांच्या ग्रिलमध्ये जावून तेथील वस्तू पळवतात.तर अनेकदा छोटी पिल्ल इमातींच्या खिडक्यांतून घरातही शिरल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत.
दरम्यान माकडांचे अतिक्रमण रोखण्यासाठी प्रचिलीत उपाययोजना पुढील प्रमाणे आहेत. मात्र त्याची योग्य अमंलबजावणी होताना दिसत नाही. नसबंदी कार्यक्रम राबवणे , अधिवासाचे बळकटीकरण करणे यासाठी जंगलात फळझाडांची लावड वाढवणे या उपाययोजणांची गरज असताना प्राण्यांच्या अधिवासात नागरिकांचा हस्तक्षेप वाढल्याचे चित्र आहे. येऊर सध्या बंगल्याचे केंद्र झाल्याने माकडांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होऊन लागल्याने माकड मानवी वस्तीत अतिक्रमण करू लागले आहेत. तसेच माकडांविषयी जनजागृती करणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे.