

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेळीमुळे आज (दि.८) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना एका दिवसात दोनदा धक्के मिळाले आहेत. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी आज सकाळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
गुरूवारी (दि.८) दुपारी पुन्हा माजी विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केनी आणि युवा नेता मंदार केनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते धनुष्य बाण हाती घेऊन आमदार आव्हाड यांना जबरदस्त धक्का दिला आहे. ही प्रवेश ज्याप्रमाणे राष्ट्रवादीला धक्का आहे त्याप्रमाणे भाजपची ताकद वाढविण्याच्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या मोहिमेला ब्रेक असल्याचे ही बोलले जात आहे.