Mira Road Crime: घरगुती वादातून विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघांवर गुन्हा दाखल

मिरा रोड , पूर्व येथील गीता नगर, फेज-2 मधील जय शिवमंगल इमारतीत अविनाश पवार आणि त्यांची पत्नी श्रबानी पवार वास्तव्यास होते.
Mira Road Crime
Mira Road CrimePudhari
Published on
Updated on

मिरा रोड: मिरा रोडमधील गीता नगर परिसरात एका विवाहितेने पतीसोबत झालेल्या भांडणानंतर विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृत महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली नयानगर पोलीस ठाण्यात पतीसह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा रोड , पूर्व येथील गीता नगर, फेज-2 मधील जय शिवमंगल इमारतीत अविनाश पवार आणि त्यांची पत्नी श्रबानी पवार वास्तव्यास होते. 7 मे रोजी दुपारच्या सुमारास पती-पत्नीमध्ये जोरदार घरगुती भांडण झाले. या वादातून आलेल्या रागाच्या भरात श्रबानी यांनी घरात असलेले विषारी औषध प्राशन केले.

Mira Road Crime
Mahad storm damage: महाड तालुक्याला वादळी पावसाने झोडपले

घटनेनंतर श्रबानी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जवळच्या तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रबानी यांचे वडील प्रोनोब कोले , वय 69, रा. भाईंदर यांना जावयाने फोन करून मुलगी आजारी असल्याचे सांगत रुग्णालयात बोलावून घेतले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर शेजाऱ्यांकडून त्यांना खरी माहिती मिळाली की, भांडणामुळे मुलीने विष प्यायले आहे. दुर्दैवाने, डॉक्टरांनी तपासणी अंती श्रबानी यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

Mira Road Crime
Water Shortage: खाडीपट्ट्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण; ऐन लग्नसराईत तीव्र पाणीटंचाई

याप्रकरणी मृत श्रबानी यांचे वडील प्रोनोब कोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून नयानगर पोलिसांनी आरोपी पती अविनाश पवार आणि शशिकला पवार यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news