Mira Road Gold Theft: मिरा रोडमध्ये ४ कोटींच्या सोन्यावर नोकराचा डल्ला; राजस्थानमधून दोघांना अटक

४ किलो दागिने लंपास
Jail
JailPudhari
Published on
Updated on

मिरा रोड: मिरा रोड येथील एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानातून सुमारे ४ कोटी रुपयांचे ४ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या नोकरासह त्याच्या साथीदाराला मिरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेने राजस्थानमधील जयपूर येथून अटक केली आहे. दिनेश रावत (३५) आणि त्याला मदत करणारा ललित सिंह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिरा रोड येथील क्विन्स पार्क परिसरातील एका हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या शगुन गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानात १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४.१५ च्या सुमारास ही घटना घडली.

दुकानाचे मालक राजेश बापना (४२) यांच्या तक्रारीनुसार, दुकानात काम करणाऱ्या दिनेश रावत याने संधी साधून विविध कॅरेटचे सोन्याचे हार, मंगळसूत्र, अंगठ्या, चेन्स आणि ब्रेसलेट असा एकूण ४ किलो ३०० ग्रॅम वजनाचा मुद्देमाल चोरून पळ काढला. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Jail
Mumbra Chowpatty: मुंब्र्याच्या रेतीबंदरला ‘स्पोर्टस्‌ चौपाटी’चा साज; ९० टक्के काम पूर्ण

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. आरोपीने पलायनासाठी वापरलेला मार्ग आणि संपर्क यंत्रणा ट्रॅक करत गुन्हे शाखेच्या पथकाने थेट राजस्थान गाठले.

जयपूर येथून मुख्य आरोपी दिनेश रावत आणि त्याचा साथीदार ललित सिंह या दोघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांची आणि इतर मुद्देमालाची मोठ्या प्रमाणावर हस्तगत करण्यास सुरू केले आहे.

Jail
Uran Naka Traffic Jam: उरण नाक्यावरील वाहतूककोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा

या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच हे दागिने कुठे विकले किंवा गहाण ठेवले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे. सदर यशस्वी कारवाई गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली असून, नवघर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news