Mira Road Gym Trainer: घातक स्टेरॉइड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री; जिम ट्रेनरविरोधात गुन्हा दाखल

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
Narcotic injections
Narcotic injectionsPudhari
Published on
Updated on

मिरा रोड: शरीर सौष्ठव (बॉडी बिल्डिंग) करणाऱ्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि स्नायू वाढवण्यासाठी प्रतिबंधित व मानवी शरीरावर घातक ठरणार्‍या इंजेक्शनचा बेकायदेशीर साठा करून विक्री करणाऱ्या एका जिम ट्रेनरविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरारोड येथील रेल्वे स्टेशनजवळील कॉम्प्लेक्स- मधील दुकानात मानवी शरीराला अपायकारक ठरणारी औषधे बेकायदेशीरपणे विकली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.

Narcotic injections
Bhayandar Narcotics Case: भाईंदरमध्ये एम.डी., ब्राऊन शुगरसह दोघांना अटक; १ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त

या दुकानात डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) व वैध परवान्याशिवाय विक्रीसाठी बंदी असलेला टर्मिवा या औषधाचा साठा आढळून आला. हे औषध परिशिष्ट एच या प्रवर्गात मोडत असून, त्याचा रक्तदाब वाढवण्यासाठी किंवा अनधिकृतपणे वापर केल्यास मानवी शरीरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तरीही हे इंजेक्शन जिम करणाऱ्या तरुणांना बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याचे आढळून आले.

Narcotic injections
Thane Dahi Handi: दहीहंडी उत्सवाच्या स्वागतासाठी ठाणेकर सज्ज; दहीहंडीसाठी सुरक्षा व्यवस्था, कडेकोट पोलीस दलाची जय्यत तयारी

या प्रकरणी अन्न व औषध निरीक्षक जोसेफ मॅथ्यु चिरॅमल (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, नयानगर पोलिसांनी जिम ट्रेनर कृष्णा कनोजिया (वय ४५, रा. भाईंदर पूर्व ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम सकुडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news