Bhiwandi Minor girl assault case : अल्पवयीन मुलीवर गँगरेप!

मुलगी गर्भवती; 2 सख्ख्या भावांसह 8 जणांवर गुन्हा दाखल
Bhiwandi Minor girl assault case
अल्पवयीन मुलीवर गँगरेप!pudhari photo
Published on
Updated on

भिवंडी : घरकाम करणार्‍या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन सख्ख्या अल्पवयीन भावांसह त्यांच्या अन्य 5 अल्पवयीन मित्रांनी विविध ठिकाणी नेत अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना भिवंडीच्या शांतीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून दोन सख्खे भाऊ, त्यांची आई व अन्य 5 जणांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामपूरा हद्दीत राहणार्‍या सुलताना दळवी हिने पीडिता अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिला घरकामासाठी घरात राबवून घेतले. तिच्या एका विधी संघर्ष अल्पवयीन मुलाने प्रथम पीडितेला त्याच्या राहत्या घरी तसेच तो सध्या राहत असलेल्या निजामपूरा येथील घरात तक्रारदार मुलीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला.

तसेच 25 आणि 30 मे रोजी रात्रीच्या वेळी दुसर्‍या मुलासह चार मित्रांनी एका गाळ्यात नेवून पीडितेवर अत्याचार केला आहे. त्यानंतर 30 मे रोजी रात्री 11 वाजता आरोपींपैकी 5 मित्रांनी पीडितेला खेळण्याचा बहाणा करून तिच्याच घराजवळच असलेल्या गाळ्यात नेवून तिघांनी विनयभंग, तर दोघांनी अत्याचार केला. यातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून 4 जुलै रोजी वरील 8 जणांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सातही आरोपी अल्पवयीन

या घटनेतील सातही आरोपी अल्पवयीन असून त्यांना पुढील कारवाईसाठी शुक्रवारी सायंकाळी बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुलताना दळवी हिलाही भिवंडीतील न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती या घटनेचे तपासिक अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल अडुरकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news