MBMC elections : पालिका निवडणुकीत मागीलप्रमाणेच एससी, एसटीचे आरक्षण निश्चित

मिरा-भाईंदर: ओबीसी, महिला आरक्षण सोडत 8 ते 11 नोव्हेंबरची मुदत
MBMC elections
मिरा भाईंदर महानगरपालिकाfile photo
Published on
Updated on

भाईंदर : राजू काळे

मिरा-भाईंदर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकित मागील निवडणुकीप्रमाणेच एससी (अनुसूचित जाती) व एसटी (अनुसूचित जमाती) आरक्षणे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. तर 27 टक्के ओबीसी व 50 टक्के महिला आरक्षणाच्या सोडतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने पालिकेला 8 ते 11 नोव्हेंबर दरम्यानची मुदत दिली आहे. यावर हरकत व सूचना दाखल करण्यासाठी 17 ते 24 नोव्हेंबर दरम्यानची मुदत देण्यात आली आहे.

पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने तयार केलेला प्रभाग रचनांचा भौगोलिक प्रारूप आराखडा 3 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी प्रशासनाने 15 सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली होती. त्यावर प्राप्त झालेल्या 46 हरकतींवर 17 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. त्याचा अहवाल पालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पाठविल्यानंतर आयोगाने त्या आराखड्याला कोणताही बदल न करता जैसे थे मंजुरी दिली. यानंतर शहरातील प्रत्येक राजकीय पक्षांसह निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांना निवडणूक जाहीर होण्याचे वेध लागले आहेत.

MBMC elections
Raigad Accident : डोणवतजवळ अपघातात 3 महिन्याचे बाळ गतप्राण

तत्पूर्वी जातीनिहाय तसेच महिला आरक्षणाच्या अनुषंगाने प्रभागातील सोडत जाहीर केली जाणार आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून पालिकेला प्राप्त झालेल्या आदेशान्वये मागील निवडणुकीप्रमाणेच 4 जागा एससी व 1 जागा एसटी उमेदवारासाठी निश्चित करण्यात आल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले. एससीकरीता प्रभाग क्रमांक 11, 13, 14 व 18 तर एसटीकरीता प्रभाग क्रमांक 14 मागीलप्रमाणे जवळपास निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यंदाची निवडणूक 2011 मधील जनगणनेवर आधारीत असून त्यावेळची एकूण लोकसंख्या 8 लाख 9 हजार 378 इतकी होती. मात्र गेल्या 15 वर्षांत त्यात 5 लाखांहून अधिक वाढ झाली असली तरी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 2011 मधीलच लोकसंख्या गृहीत धरण्यात आली.

4 सदस्यांचे पॅनल निश्चित करण्यात आले

यामुळे गतवेळच्या निवणुकीतील 4 सदस्यांचे पॅनलच निश्चित करण्यात आले असून उत्तन येथील पॅनल मात्र 3 सदस्यांचेच निश्चित करण्यात आले आहे. यामुळे येथील लोकांच्या 4 सदस्य पॅनलच्या मागणीला छेद मिळाला आहे. पालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर आयोगाने शिक्कामोर्तब केल्याप्रमाणे एकूण 24 प्रभाग निश्चित करण्यात आले असून त्यात एकूण सदस्यांची संख्या 95 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

MBMC elections
Thane Politics : नेत्यांसाठी युती-आघाड्या; मात्र कार्यकर्त्यांच्या लढाईसाठी स्वबळ?

अशी आहे आकडेवारी

एकूण 95 जागांपैकी 27 टक्के जागा ओबीसी तर 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित केल्या जाणार आहेत. ओबीसींसाठी 26 तर महिलांसाठी 48 जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. मात्र या जागा कोणत्या प्रभागांत निश्चित केल्या जाणार आहेत, त्या सोडतीनंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news