डोंबिवलीत बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फसणारी घटना

घटनेचे गांभीर्य ओळखून नराधम पित्याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या
minor girl abuse case
assault casefile photo
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवलीत बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फसणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या दोन सख्ख्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीला दोन मुली आहेत. तो कोणताही काम-धंदा करत नाही. तर त्याची पत्नी मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. कामानिमित्त पत्नी बाहेर असल्याने या संधीचा फायदा घेऊन विकृत बाप आपल्या १९ वर्षीय मोठ्या मुलीवर गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता.

मात्र याबाबत घाबरलेल्या मुलीने आईला अथवा कुणालाही माहिती दिली नाही. त्यामुळे विकृत बापाचे मनोधैर्य वाढत चालले होते. पोटच्या पोरीवर हा विकृत अत्याचार करत होता. गेल्या अनेक महिन्यांपासून मोठी मुलगी पित्याकडून होणारा अत्याचार सहन करत होती. त्यानंतर या नराधम पित्याची मजल आणखीन वाढली. त्याने त्याच्या दहा वर्षांच्या मुलीवर देखील अत्याचार सुरू केले.

मोठ्या बहिणीने या विरोधात आवाज उठून घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. हे ऐकून आईच्या पायाखालची वाळू सरकली. तिने लागलीच मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपल्या विकृत पतीच्या विरोधात कैफीयत मांडली. पोलिसांनी सदर महिलेसह तिच्या दोन्ही मुलींची आस्थेवाईकपणे विचारपूस करून धीर दिला. त्यानंतर विकृत नराधम पित्याच्या विरोधात पिडीत मुलींच्या फिर्यादीवरून विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. मानपाडा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नराधम पित्याला बेड्या ठोकून गजाआड केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news