

ठाणे : खाडीतील खारफुटीची कत्तल, त्यावर भर टाकून अनधिकृत चाळी उभ्या राहत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी हिरवा पट्टा वाढविताना मँग्रोजचे संरक्षण व संवर्धनासाठी राज्यात मँग्रोज पार्क उभारण्यात येणार असून त्यासाठी टीडीआर, एफएसआय देण्याबाबतचे नवे धोरण तयार केले जात असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केली.
ठाण्यातील एका कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाण्याच्या र्हास होणारे पर्यावरण आणि नागरी समस्यांबाबत व्यक्त केलेल्या नाराजी व्यक्त केली. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सुरु असलेल्या कामाची जंत्री सांगताना मँग्रोजच्या संरक्षणासाठी राज्य सरकार नवीन धोरण आणत असल्याचे स्पष्ट केले. नगरविकास मंत्री शिंदे पुढे म्हणाले पर्यावरणाचा र्हास होत असल्याने पावसासह कसे ऋतू बदलतात हे सांगताना हिरवा पट्टा वाढविताना ठाण्यात 25 एकरमध्ये सेंटर पार्क, शहरात विकसित केलेले 145 उद्याने, गायमुख येथील उद्यान, कोस्टल ग्रीन कव्हर, वर्षाला एक लाख झाडे लावणे, अर्बन फॉरेस्ट विकसित केल्याचे सांगितले. मी शेतकर्याचा मुलगा असून गावी केल्यावर एक दोन हजार झाडे लावूनच येतो. गावी गेलो की इकडे यांना त्रास होतो. परवा दिल्लीत गेल्यावर इकडे ह्यांना त्रास झाल्याचे सांगून त्यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला.
घोडबंदर रोडवरील गायमुखाचा रस्ता वारंवार दुरुस्ती होऊनही अवजड वाहने आणि पावसामुळे तो टिकत नाही. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. यावर म्हणून एलिव्हेटर पद्धतीने 60 मीटरच्या रस्त्यास मंजूर देण्यात आली असून तो रस्ता होईपर्यंत वाहुतककोंडी सोडविण्यासाठी मस्टिकपद्धतीने दुरुस्ती केली जात असल्याने तो नक्कीच टिकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना सोबत घेऊन कासारवडवली ते गायमुख येथील खड्ड्यात हरविलेल्या रस्त्याची अचानक पहाणी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी ठाण्याची वाहतूक कोंडी सोडविण्यास प्राधान्य दिल्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्याचे सांगितले.
ठाणे शहरात कायदे तर बदलले नाहीत ना? ठाण्यात वाहन चालक रस्त्याच्या उलट दिशेने गाड्या चालवू लागले आहेत. ‘आरटीओ’च्या नियमात काही बदल झाले आहेत का,? शहरात काही नवीन संस्कृती उदयास आली आहे का, शहरात पर्यावरण वृक्ष तोड मोठ्याप्रमाणात होतया आहे, मोकळे पदपथ नाहीत. परवडणारी घरे नाहीत, तलावांच्या शहरात तलाव कुठे आहेत किती नवीन उद्याने बांधली? ठाणे स्थानकाच्या बाहेर लोकांना चालायला जागा नाही, असे अशी नाराजी व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यांनी अभय ओक यांनी ठाण्यातील समस्यांवर परखड भाष्य केले. ही खंत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांच्या समक्ष व्यक्त केली. ठाणे शहरात 40-50 मजली इमारत उभ्या राहत आहेत. येथील घरे सामान्यांना न परवडणारी आहेत. सामान्य माणसाला परवडतील अशा वैद्यकीय सुविधा ठाण्यात किती उपलब्ध आहेत, सामान्य माणसाला परवडतील अशा किती शाळा ठाण्यात आहेत, शिक्षणाच्या किती सुविधा उपलब्ध आहेत, याचा विचार आपल्याला हवा असे ही ओक म्हणाले.