Mental Hospital: राज्यातील मनोरुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये होणार रूपांतर; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

ठाणे, येरवडा, रत्नागिरी आणि नागपूर मनोरुग्णालयांना मिळणार नवसंजीवनी
Mental Hospital
Mental HospitalPudhari
Published on
Updated on

ठाणे: महाराष्ट्रातील मनोरुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे ठाणे मनोरुग्णालयाबरोबरच येरवडा, रत्नागिरी आणि नागपूर मनोरुग्णालयांना नवीन संजीवनी मिळणार असून आरोग्य सेवेचा विस्तार होणार असल्याची माहिती त्‍यांनी दिली आहे. येरवडा (पुणे), ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील चार प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालये समाजातील विशेषतः वंचित घटकांना मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा पुरवत आहेत.

बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवांद्वारे ही रुग्णालये हजारो रुग्णांना उपचार देत असून, सुमारे 5700 खाटांची सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा व मनुष्यबळ आहे.

या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने या रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र शासनाच्या मॅनपॉवर डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत, स्ट्रेंथनिंग पीजी डिपार्टमेंट इन मेंटल हेल्थ स्पेशालिटिज (स्कीम बी) या योजनेनुसार मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत (एनएमएचपी) 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेने विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

ठाणे मनोरुग्णालयात या अभ्यासक्रमांना मान्यता

  • एम. डी. सायकिॲट्री

  • एम. फिल क्लिनिकल सायकॉलॉजी

  • एम. फिल सायकियाट्रिक सोशल वर्क

  • डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग

नर्सिंग क्षेत्रातही प्रगती

प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे व पुणे येथे डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग अभ्यासक्रम 2022-23 पासून सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी दरवर्षी 20 विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. आतापर्यंत ठाणे येथून 59 आणि पुणे येथून 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित नर्सिंग कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढण्यास मदत होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news