

ठाणे : महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कचर्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि अपुरे व्यवस्थापन यामुळे घनकचरा व्यवस्थापन कोलमडले आहे. सरकारी यंत्रणा यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते.
राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि प्रमुख शहरांचा झपाट्याने विकास झाला असला तरी वाढती लोकसंख्या व शहरीकरणाच्या रेट्यात घनकचर्याचे व्यवस्थापन बिघडलेलेच आहे. एकट्या मुंबई एमएमआर रिजनचा विचार केल्यास येथे रोज 10,550 मेट्रिक टन कचर्याची निर्मिती होत असून यामध्ये एकट्या मुंबई महापालिका क्षेत्रात 7,500 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. प्रमुख शहरांमधील डम्पिंग ग्राउंडची संपलेली क्षमता, नवीन ठिकाणी डम्पिंगच्या निर्मितीला होणारा विरोध तसेच घनकचरा व्यवस्थापनाचे फसलेले प्रयोग यामुळे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन कोलमडले आहे.
* विषारी आणि बायोमेडिकल कचर्याकडे दुर्लक्ष
* महाराष्ट्रामध्ये दरवर्षी अंदाजे 93 लाख मेट्रिक टन कचरा तयार होतो.
* त्यापैकी 80% म्हणजेच 75 लाख टन कचरा महापालिका क्षेत्रांत निर्माण होतो.
* महाराष्ट्रात रोज 43.5 टन बायोमेडिकल कचरा तयार होतो. हा देशातील एकूण बायोमेडिकल कचर्याच्या 60% आहे.
* दरवर्षी 18 लाख टन विषारी कचरा विविध कारखान्यांमधून तयार होतो.
* पुढे काय करायला हवे?
* कचर्याचे पुनर्वापर आणि प्रक्रिया यावर भर द्यायला हवे.
* कचर्याकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहावे.
* सेंद्रिय आणि असेंद्रिय कचर्याचे योग्य वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करावी.
* जनजागृती आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरू शकतो.