Ladki Sunbai Yojana: आता सूनबाईसुद्धा होणार सरकारची ‘लाडकी’?

‘लाडकी सूनबाई’ योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यात घोषणा करण्याची शक्यता
Women Empowerment
Women EmpowermentPudhari
Published on
Updated on

ठाणे : प्रवीण सोनावणे

राज्यात सुरु असलेल्या ’मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता ’लाडकी सुनबाई’ योजना सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार असून या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी ठाण्यात करण्याची शक्यता आहे.

आता लाडक्या बहिणीप्रमाणे सुनबाई देखील लाडकी होणार असल्याने महापालिका निवडणुकीच्या पूर्वी या योजनेचा फायदा महायुतीला अधिक व्हावा या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नूतनीकरणीकरणानंतर रसिकांच्या सेवेत दाखल झालेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, याच वेळी ते लाडकी सून योजना जाहीर करू शकतात, असे समजते. वधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जाहीर झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने मोठा फायदा महायुतीला झाला.

या योजनेत महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळत आहेत. ते देताना राज्य सरकारला मात्र तारेवरची आर्थिक कसरत करावी लागत असतानाच या योजनेत घुसखोरी करणार्‍या अनेक शासकीय कर्मचारी महिला उघडकीस आल्या. काही हजार पुरुषांनीही लाडकी बहीण बनून या योजनेचा लाभ मिळवल्याचे समोर आले. परिणामी, ही योजना वादात सापडली. संपूर्ण छाननी केल्यानंतर लाभार्थी लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार असल्याचे स्पष्ट संकेत असतानाच आता लाडकी सून योजना येऊ घातल्याचे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news