FDA Raid : मुदतबाह्य अन्नपदार्थ पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणले

अमेझॉन रिटेलच्या अधिकाऱ्यांसह दोघां विरोधात गुन्हा दाखल
FDA Raid
FDA Raidpudhari photo
Published on
Updated on

भिवंडी : संजय भोईर

सध्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवायांचा धडका सुरू असून नुकताच त्यांच्या मार्गदर्शना खाली बुधवारी मध्यरात्री भिवंडी तालुक्यातील सरवली गावच्या हद्दीतील अमेझॉन रिटेल इंडीया या गोदामातील मुदतबाह्य अन्न पदार्थ नागरीकांची दिशाभूल करुन मानवी आरोग्यास घातक अन्नपदार्थ नष्ट न करता अन्नपदार्थ अन्नसाखळीत वळवून बाजारात विक्री करीत असल्या प्रकरणी दोघां विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरवली येथील अमेझॉन रिटेल इंडीया प्रा.लि.व आर के ट्रेडर्स यांच्या संगनमताने मुदतबाह्य अन्न पदार्थ नष्ट न करता बाजारात विक्री साठी संगनमताने वळवत असल्याची माहिती मिळाल्या नंतर बुधवारी मध्यरात्री अन्न सुरक्षा पथकाने केलेल्या कारवाईत आर के ट्रेडर्सचे मालक रहमान के व अमेझॉन रिटेल इंडीया प्रा.लि.चे फॅसिलीटी मॅनेजर पश्चिम क्षेत्र सोमशेखर बसवराज कोन्नर यांच्या संगनमताने दोन्ही आस्थापनेतील संबधित व्यक्ती यांनी नागरीकांची दिशाभूल करुन मानवी आरोग्यास घातक अन्नपदार्थ नष्ट न करता अन्नपदार्थ अन्नसाखळीत वळवून बाजारात विक्री करीत होते.

FDA Raid
अर्थवार्ता : अमेरिका-इराण तणाव निवळताच शेअर बाजार सुसाट! सेन्सेक्स ७५,५०० पार, तर निफ्टी २३,६०० च्या पुढे

सदर विक्री करीत असतांना मे.आर के टेडर्सचे मालक रहमान के यांनी कराराचे पालन न करता अन्नपदार्थ विल्हेवाटीचे खोटे प्रमाणपत्र बजावले आहेत. या गुन्ह्यांमध्ये मे.अमेझॉन रिटेल इंडीया प्रा.लि.चे कालबाहय व खराब अन्नपदार्थ विल्हेवाट हाताळणारे संबधित कर्मचारी व फॅसिलीटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नुर हे सामिल असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद वसंत कांडेलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलिस ठाण्यात मे. आर के टेडर्सचे मालक रहमान के व अमेझॉन रिटेल इंडीया प्रा.लि.चे फॅसिलीटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नुर या दोघां विरोधात मानवी आरोग्यास घातक अन्नपदार्थ नष्ट न करता अन्नपदार्थ अन्नसाखळीत वळवुन बाजारात विक्रीस आणुन नागरीकांची दिशाभूल केली म्हणुन बीएनएस कलम ३१८(४), २७४, ३(५) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६(१), २६ (२) (आय), २७(१), २७ (३) (ई) ३१ (१) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष बोराडे हे अधिक तपास करीत आहेत.

FDA Raid
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; आयटी शेअर्सवर दबाव, सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ घसरणीसह उघडले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news